मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे..प्रतिनिधी...
महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. उदय सामंत साहेब यांची शिवसेना पुणे, मावळ,कोल्हापूर संपर्कप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर आज पुणे शहरातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या बैठकीत संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली असून, आगामी काळात पुणे शहरात शिवसेना अधिक ताकदीने आणि प्रभावीपणे उभी करण्याचा निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने व्यक्त केला.
यावेळी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, पुण्यात शिवसेनेचे कार्य अधिक जोमाने आणि संघटित पद्धतीने पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला. माननीय उदय सामंत साहेब यांनी संघटन विस्तार, कार्यपद्धती आणि कार्यकर्त्यांशी संवाद याबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. "पुण्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रियपणे काम करणे आवश्यक आहे. संघटनेची ताकद हीच आपली खरी ओळख आहे," असे सामंत साहेब यावेळी म्हणाले. तसेच विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम ताई गोऱ्हे यांनी पदाधिकाऱ्यांना संघटन मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना प्रेरित केले.
या बैठकीस पुणे शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकजुटीच्या बळावर आणि नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात शिवसेना अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



Post a Comment
0 Comments