मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे..प्रतिनिधी..
ही संधी दिल्याबद्दल युवक काँग्रेसचे राष्ट्रीय इन्चार्ज मनीष शर्मा, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब, महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा, सह प्रभारी शांभवी शुक्ला, नवज्योत जी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा. शिवराज दादा मोरे यांचे मनःपूर्वक आभार मानतो. असे श्री आबनावे यांनी स्पष्ट केले
मा. शिवराज दादा मोरे यांचे नेतृत्व हे संघर्षातून घडलेले, कार्यकर्त्यांच्या विश्वासावर उभे असलेले खरे नेतृत्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अनेक निर्णायक आंदोलनांमध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळाली—हीच माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे.
भारत जोडो यात्राचे नियोजन, भारत जोडो न्याय यात्रेतील सक्रिय सहभाग, MPSC Pattern Change 2025 विरोधातील उपोषण, अग्निवीर योजनेविरोधातील दिल्ली वm येथील रेल्वे रोको आंदोलन, पुण्यातील खडकी येथे रेल्वे रोको आंदोलन, प्रवाशांवरील अन्यायकारक भाडेवाढीविरोधातील लढा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी केलेला संघर्ष, तसेच मशाल मोर्चे नुकतेच ट्रेड डील विरोधात पीएम कॉम्प्रमाईज आंदोलन—या प्रत्येक संघर्षात मी एक कार्यकर्ता म्हणून पूर्ण ताकदीने उभा राहिलो आहे.
तसेच दिल्ली, पुणे, नागपूर, मुंबई या ठिकाणी असंख्य आंदोलने करत, काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि युवकांचे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्याची संधी मला मिळाली. विविध निवडणुकांमध्ये विक्रमी लोकांपर्यंत युवक काँग्रेसच्या डोअर टू डोअर योजनेच्या माध्यमातून पोहोचण्याचे काम करताना, संघटनेचा विश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला.
मा. शिवराज दादा मोरे यांनी दिलेली ताकद, विश्वास आणि संधी यामुळेच या सर्व लढ्यांमध्ये उभं राहण्याचं धैर्य मिळालं.
त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची विचारधारा महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्याचे काम करण्याची संधी मिळाली—आणि त्या प्रत्येक संधीला न्याय देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
या प्रवासात आमचे कौटुंबिक मार्गदर्शक मोहन जोशी (उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांचे आशीर्वाद , मार्गदर्शन, सदैव काम करण्याची प्रेरणा कायम माझ्या पाठीशी आहे याची मला जाणीव आहे
, तसेच माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे प्रेम, त्याग आणि निःस्वार्थ साथ हीच माझी खरी ताकद आहे.
खरंतर हा क्षण माझ्यासाठी फार भावनिक आहे वडिलांच्या 68 व्या जयंतीनिमित्त माझी महाराष्ट्रात युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपदी निवड , एक प्रकारे त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याची मला जाणीव करून देतो
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. शिवराज दादा मोरे यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो, त्यांनी दिलेल्या संधीमुळेच युवकांच्या प्रश्नांसाठी अधिक ताकदीने लढण्याची प्रेरणा आणि दिशा मिळाली.
आजची ही जबाबदारी म्हणजे केवळ पद नाही—तर युवकांच्या विश्वासाची, अपेक्षांची आणि स्वप्नांची जबाबदारी आहे. त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी, संघर्ष अधिक तीव्र करण्यासाठी आणि काँग्रेसची विचारधारा महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मी अखंड प्रयत्न करेन—हीच माझी प्रतिज्ञा.
✨
“लढ्यांतून घडली ओळख, संघर्षात सापडली वाट,
विश्वासाने दिलेल्या संधीवर घडवेन नवा इतिहास ठामपणे आज.”

Post a Comment
0 Comments