Type Here to Get Search Results !

काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद..!! महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद वाढवण्यासाठी “संघटन सृजन अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पक्षाची रचना अधिक प्रभावी करण्यावर आणि विविध घटकांना एकत्र आणण्यावर भर दिला जात आहे.

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद..!!


नाशिक ..प्रतिनिधी 


महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद वाढवण्यासाठी “संघटन सृजन अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून पक्षाची रचना अधिक प्रभावी करण्यावर आणि विविध घटकांना एकत्र आणण्यावर भर दिला जात आहे.



महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार आणि एआयसीसीच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या अभियानांतर्गत गेल्या तीन दिवसांत नाशिक येथे विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.



या अभियानाचे समन्वयक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री मा. रमेशदादा बागवे यांनी केले. त्यांच्या सोबत एआयसीसीचे निरीक्षक मा. मकसूद खान जी, तसेच एमपीसीसीच्या पदाधिकारी सौ. श्रुती ताई म्हात्रे आणि श्री. दर्पण सिंग गिरासे उपस्थित होते.

नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री. आकाश छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व पदाधिकारी, ब्लॉकनिहाय कार्यकर्ते यांनी सक्रिय सहभाग घेतला. या अभियाना दरम्यान NSUI, , अल्पसंख्याक विभाग, मागासवर्गीय विभाग, युथ काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवा दल तसेच इतर विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी भेटीगाठी घेण्यात आल्या.


तसेच विविध सामाजिक संस्था आणि वरिष्ठ नागरिक शिष्टमंडळांशी संवाद साधून पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आढावा घेण्यात आला. या उपक्रमाला नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

0 Comments