मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत
मुंबई..प्रतिनिधी...
मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची आढावा बैठक उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली.
राज्यातील विविध भागांतून आलेल्या पदाधिकाऱ्यांना या बैठकीत नामांकित नेत्यांनी मार्गदर्शन करत संघटन बळकटी, जनसंपर्क वाढविणे आणि संपूर्ण वर्षभराच्या वाटचालीबाबत सविस्तर चर्चा केली. पुढील काळातील राजकीय व संघटनात्मक आखणी निश्चित करण्यात आली.
या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ साहेब, माजी महसूल मंत्री **बाळासाहेब थोरात**जी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ पदाधिकारी व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील साहेब, तसेच माजी गृहराज्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आदरणीय रमेश बागवे साहेब यांची उपस्थिती लाभली. याच वेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यात आली.
काँग्रेस भवनावरील हल्ल्याला दिलेल्या ठाम आणि प्रभावी प्रत्युत्तराबद्दल माझे विशेष कौतुक करण्यात आले, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.
या प्रसंगी ज्येष्ठ विचारवंत पत्रकार राजू परुळेकर आणि गोयंका पुरस्कार विजेते मा. अमेय तिरोडकर यांचेही मौल्यवान मार्गदर्शन लाभले. काँग्रेसच्या विचारधारेचा वारसा, लोकशाही मूल्ये, संविधानिक तत्त्वे, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकास या मूलभूत तत्त्वांवर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी, शेतकरी-कामगारांच्या प्रश्नांसाठी आणि लोकशाही रक्षणासाठी ठाम राहिली आहे. अन्याय, भीती आणि दडपशाहीविरुद्ध लढा देत संविधानाच्या चौकटीत समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणे, हीच काँग्रेसची विचारधारा आहे.
संघटन अधिक मजबूत करण्याचा आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा निर्धार या बैठकीतून अधिक दृढ झाला.



Post a Comment
0 Comments