Type Here to Get Search Results !

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने 13 फेब्रुवारी 2026 ते 23 फेब्रुवारी 2026 या दहा दिवसांमध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबांचे कीर्तन पुण्यातील एकपात्री कलावंत नटश्रेष्ठ कुमार आहेर जागर करीत आहेत.



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे...

 राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने 13 फेब्रुवारी 2026 ते 23 फेब्रुवारी 2026  या दहा दिवसांमध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबांचे कीर्तन पुण्यातील एकपात्री कलावंत नटश्रेष्ठ कुमार आहेर जागर करीत आहेत.


हे किर्तन पुणे शहरातील विविध ठिकाणी दररोज एक ते दोन ठिकाणी होत आहे.


 पुण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती साधना मीडिया सेंटर, शनिवार पेठ, पुणे. पद्मावती, नवी सांगवी, कॅम्प, पिंपरी चिंचवड, कोथरूड,  संत गाडगेबाबा मठ, रास्ता पेठ ,दापोडी, व पुणे शहर अशा विविध ठिकाणी झालेले आहेत.


दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी कलाकार कट्टा गुडलक हॉटेल जवळ डेक्कन , पुणे या ठिकाणी संध्याकाळी 6.30 वाजता राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त कीर्तनातून जागर करण्यात येणार आहे. 


वर्ड आर्टिस्ट डेव्हलपमेंट फेडरेशनच्या वतीने हा कीर्तनाचा कार्यक्रम होत असून मुख्य संयोजक शिल्पकार सुरेश राऊत हे आहेत. 


या कीर्तनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय गिरीशा निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन पोलीस स्टेशन पुणे, या उपस्थित राहणार असून कलाकार कट्ट्यातील अनेक क्षेत्रातील कलावंत उपस्थित राहणार आहेत. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप बर्वे व चित्रकार आनंद टेके हे करणार आहेत. 

नट श्रेष्ठ कुमार आहेर संत गाडगेबाबांच्या शैलीतून हे कीर्तन सादर करणार आहेत.

Post a Comment

0 Comments