Type Here to Get Search Results !

गुडलक चौक परिसरातील ‘कलाकार कट्टा’ स्थलांतर निर्णयाचा पुनर्विचार व्हावा – नगरसेवक हर्षवर्धन मानकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक श्री. हर्षवर्धन दीपक मानकर यांनी ‘कलाकार कट्टा’ गुडलक चौक येथे भेट देत, सध्यस्थितीतील वस्तुस्थिती, वाहतुकीचे नियोजन, जागेची पाहणी करून कलाकार कट्टा स्थलांतरास विरोध दर्शवत कलाकारांना पाठींबा दिला.



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 



पुणे..प्रतिनिधी...

गुडलक चौक परिसरातील ‘कलाकार कट्टा’ स्थलांतर  निर्णयाचा पुनर्विचार व्हावा – नगरसेवक हर्षवर्धन मानकर  

              राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक श्री. हर्षवर्धन दीपक मानकर यांनी ‘कलाकार कट्टा’ गुडलक चौक येथे भेट देत, सध्यस्थितीतील वस्तुस्थिती, वाहतुकीचे नियोजन, जागेची पाहणी करून कलाकार कट्टा स्थलांतरास विरोध दर्शवत कलाकारांना पाठींबा दिला. 


हा कट्टा गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य घटक म्हणून कार्यरत आहे. हा कट्टा केवळ एक भौतिक जागा नसून, तो कलाकार, कवी, लेखक, चित्रकार, संगीतकार, नाट्यकर्मी, विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी मुक्त संवादाचे व्यासपीठ आहे. 




भाजप माजी नगरसेविकांच्या संकल्पनेतून गुडलक चौकातील कलाकार कट्टा साकारण्यात आला आहे. मात्र, या परिसरात वाहतुकीची कोंडी होत असल्याच्या कारणावरून भाजपच्याच नगरसेवकांनी पुणे महानगरपालिका आयुक्तांना कलाकार कट्टा स्थलांतरीत करण्यासंबधी लेखी पत्र दिले आहे. त्या अनुषंगाने नगरसेवक श्री. हर्षवर्धन मानकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून, स्थलांतरामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या अडचणी, कलाकारांवरील परिणाम, आणि स्थानिक नागरिकांवर होणारा परिणाम याबाबत उपस्थित कलाकारांशी चर्चा  केली. सदरप्रसंगी बोलताना नगरसेवक हर्षवर्धन मानकर म्हणाले,"कलाकार कट्टा हे पुण्यातील सांस्कृतिक वारसा आहे. याचे स्थलांतर म्हणजे कलाकारांच्या आणि कला रसिकांच्या हक्कांवर परिणाम होऊ शकतो. 


नगरपालिकेने स्थानिक नागरिकांचा आणि कलाकारांचा सल्ला घेतल्याशिवाय अशी पावले उचलू नये. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री श्रीम. सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, पुणे मनपा आयुक्त श्री. नवल किशोर राम यांना स्थलांतर निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी पत्र व्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments