Type Here to Get Search Results !

महाशिवरात्री निमित्त भरत मित्रमंडळ मोदी गणपती चौक नारायणपेठ यांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.




मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


 पुणे (दि.१५) महाशिवरात्री  निमित्त भरत मित्रमंडळ मोदी गणपती चौक नारायणपेठ  यांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.


यामध्ये सजविलेल्या चित्र रथावर भव्य शिवप्रतिमा,बँड पथक,वारकरी पथक,शिव पर्वती विवाह पथक,मोठ्या बाहुल्या,ध्वज पथक,व ध्वनी क्षेपक वाहन यांचा समावेश होता. 



ही मिरवणूक मोदी गणपती चौक,नारायणपेठ पोलीस चौकी,केळकर मार्गाने अप्पा बळवंत चौक व मोदी गणपती चौक येथे विसर्जित झाली, 


या मिरवणूक प्रसंगी भरत मित्र मंडळ महाशिवरात्र समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर,निरंजन दाभेकर,अनिल येनपुरे,महेश वाघ,राजेंद्र पंडित,प्रमोद घाडगे,चंदन बकरे,उमेश मिस्त्री,दिलीप ठोंबरे आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर,भरत मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते,तसेच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.  


Post a Comment

0 Comments