मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे..प्रतिनिधी..
शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालय हद्दीत बालगंधर्व चौक ते डेक्कन ते ज्ञानेश्वर पादुका चौक येथे आज दिनांक १४/०२/२६ रोजी अतिक्रमण निर्मूलन विभाग उपायुक्त श्री सोमनाथ बनकर , सौ.पूजा जागडे (विद्यमान नगरसेविका) , सौ.मेहेत्रे ( विद्यमान नगरसेविका),श्री. अपूर्व खाडे ( विद्यमान नगरसेवक ) यांच्यासह १५ क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाकडे यंत्रणा जेसीबी, गॅस कटर , ओपन ट्रक बिगारी सेवक महाराष्ट्र पोलीस सुरक्षा बल यांच्या उपस्थितीमध्ये कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई मध्ये रस्ता व पदपथ, फ्रंट मार्जिन साईड मार्जिन इत्यादी ठिकाणी कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये फ्रंट मार्जिन मधील व्यावसायिकांनी अनधिकृतपणे लावलेल्या खुर्च्या, टेबल ,लोखंडी जाळ्या,होजिअरी,हातगाडी ,फ्रिज, तसेच रस्ता व पदपथावरील अनधिकृत पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत सुमारे ०५ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन मधील कच्चे पक्के शेड ,टपऱ्या निष्कासित करण्यात आले.
यापुढे देखील वारंवार अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असून अनधिकृत व्यावसायिकांनी व्यवसाय करू नये असे आवाहन केले.
सदर कारवाईबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे*



Post a Comment
0 Comments