मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे..
कॉंग्रेस भवनावर हल्ला; अनेक कार्यकर्ते आणि महिला भगिनी जखमी!
कॉंग्रेस भवनात घुसखोरीचा प्रयत्न करत काही अराजक तत्वांनी बाहेरून दगडफेक केली. या भ्याड हल्ल्यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून महिला भगिनींनाही मार बसला आहे. एका मोटारीची काच फोडून मालमत्तेचेही नुकसान करण्यात आले. हा प्रकार केवळ निषेधार्ह नाही, तर पुण्याच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला काळिमा फासणारा आहे.
पुण्याची राजकीय संस्कृती ही विचारांची लढाई लढणारी, संवाद आणि संयम जपणारी आहे. मात्र अशा हिंसक कृत्यांमुळे शहरातील राजकीय वातावरण जाणीवपूर्वक बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचे स्पष्ट दिसते.
शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पोलिस प्रशासनाला कठोर शब्दांत जाब विचारत दोषींवर तात्काळ आणि कडक कारवाईची मागणी केली आहे. लोकशाहीत दगडफेक, दहशत आणि महिलांवर हात उचलण्याला मुळीच स्थान नाही — कायद्याचा धाक सर्वांना समान असला पाहिजे!
यावेळी राज्याचे माजी गृहराज्य मंत्री रमेशदादा बागवे, मा प्रशांत जगताप तसेच काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments