मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे दि. ८- फुलेनगर- नागपूर चाळ प्रभाग क्रमांक २ भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे अधिकृत उमेदवार ऍड. रेणुका चलवादी , सुभाष वाघमोडे ,राहुल जाधव व भाजपा पुरस्कृत आदिती बाबर यांनी नागपूरचाळ , शांतीनगर, कामगारनगर, प्रेस कॉलनी ,मेंटल कॉर्नर, जाधवनगर या ठिकाणी प्रत्येक मतदारांच्या घरी जाऊन प्रचार केला प्रभागाचा विकासाला चालना देण्यासाठी भाजपला बहुमत द्या असे आवाहन रेणुकाताई यांनी केले.
पदयात्रेदरम्यान व गृहभेटीदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग व सकारात्मक प्रतिसाद मिळाला यावेळी अनेक मंडळे महिला मंडळ महिला बचत गटाच्या नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यावर सकारात्मक चर्चा करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन रेणुकाताई चालवादी यांनी दिले ठिक ठिकाणी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला .या रॅलीमध्ये उमेदवारासमवेत सामाजीक कार्यकर्ते के .टी. सूर्यवंशी , स्वप्नील शिर्के ,नागाप्पा गुडद्वार, अमरेश चालवादी , पूजा वाघमारे ,उमेश वाघमारे ,प्रतीक्षा वाघमारे, प्रज्ञा ओव्हाळ , सीमा धावरे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments