Type Here to Get Search Results !

प्रभागात विकासाची पायाभरणी करणार -ऍड. रेणुकाताई चलवादी .....

  


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


 पुणे दि. ९ - फुलेनगर- नागपूर चाळ प्रभाग क्रमांक २  भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे अधिकृत उमेदवार ऍड. रेणुका चलवादी , सुधीर वाघमोडे ,राहुल जाधव व भाजपा पुरस्कृत आदिती बाबर यांनी महाराष्ट्र हौशिंग बोर्ड याठिकाणी घरोघरी जाऊन गाठीभेटी घेऊन आशीर्वाद घेतले.


यावेळी बोलताना रेणुकाताई यांनी विकासाची पायाभरणी करत स्वच्छ व पारदर्शक कारभारावर भर देणारअसून घोकेदायक घरांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले.प्रभागातील  सर्व समस्या सोडवण्यासाठी भाजपा आर पी आय  महायुतीच्या  चारही उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन चलवादी  यांनी केले .त्यानंतर चारही उमेदवारांनी राजीव गांधी नगर,नानासाहेब परुळेकर शाळा , फुलेनगर ,हरीगंगा सोसायटी ,पोलीस लाईन  या भागात पदयात्रेद्वारे मतदाराशी संवाद साधला .

Post a Comment

0 Comments