मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
...................पुणे दि.१२- प्रभाग क्रमांक २फुलेनगर - नागपूरचाळ येथील भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे उमेदवार ऍड. रेणुका चलवादी, सुधीर वाघमोडे, आदिती बाबर व राहुल जगताप या युवा व उच्चशिक्षित उमेदवारांना प्रभागातील माजी सैनिक , ट्रेडर्स अँड कस्टमर असोसिएशन व जैन समुदायातील नागरिकांनी जाहीर पाठिंबा दिला. शांतीनगर कॉर्नर येथील एका कार्यक्रमात हा पाठिंबा जाहीर करण्यात आला. पाच वर्षात प्रभाग क्रमांक २ फुलेनगर - नागपूरचाळ हा प्रभाग पुण्यातील एक नंबरचा प्रभाग बनवण्याचा संकल्प करण्यात आला.
या प्रभागाच्या आसपास एमईएस ,एअर फोर्स व अमिनिसिएम फॅक्टरी असल्याने नोकरीसाठी आलेले अनेक मंडळी याच भागात वास्तव्यात आहे , तसेच विश्रांतवाडी नागपूरचा परिसरात बाजारपेठ असल्याने हे व्यावसायिक व जैन बांधव मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहत आहे .त्यांचा जाहीर पाठिंबा भाजप आरपीआयच्या उमेदवारांना दिल्याने या चारही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे उमेदवारांनी सांगितले .त्यापूर्वी संपूर्ण परिसरात चारही उमेदवारांनी पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या व त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ऍड. रेणुका चलवादी यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments