मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे दि. 13 पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक २ फुलेनगर नागपूरचाळ मध्ये भारतीय जनता पार्टी आरपीआय महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. प्रभागातून निघालेल्या टू व्हिलर रॅलीने मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. प्रभाग२ चे अधिकृत उमेदवार ऍड. रेणुका चलवादी ,सुधीर वाघमोडे, आदिती बाबर व राहुल जाधव यांनी मतदारांना कमळ व चष्मा या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले . 'जनतेचा हा उत्साह सांगतोय की बदल निश्चित आहे असा विश्वास; उमेदवारांनी व्यक्त केला.
बाईक रॅलीमध्ये मंगेश गोळे ,महेश पाटील ,नानासाहेब नलावडे , डॉ. हुलगेश चलवादी ,भगवान जाधव , सुभाष चव्हाण , राजू बाफना , बाळासाहेब जानराव , चंद्रकांत जंजिरे ,हर्षद जाधव ,प्रकाश सोनवणे ,श्यामाताई जाधव ,विनोद टोपे ,शाम सदाफुले , निरंजन मराठे ,विजय बल्लाळ, स्वप्नील शिर्के ,भाजपा आरपीआय चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागपूर चाळ, महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड, जेलरोड ,फुलेनगर, इंदिरानगर, शांतीनगर ,विद्यानगर भागातून आलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
सर्व परिसरात भाजपच्या बाजूने पोषक वातावरण झाले आहे , उमेदवारांचा दांडगा जनसंपर्क आणि विकासाची दृष्टी यामुळे रॅलीस तरुणासह नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. महिला आणि तरुणांचा सहभागाने भाजपच्या या चारही उमेदवारांना उमेदवारांचा उत्साह वाढला आहे, सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे यावेळी उमेदवारांनी सांगितले.



Post a Comment
0 Comments