Type Here to Get Search Results !

शांतता पुणेकर वाचत आहेत मध्ये उद्यम विकास सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग नागरिकांनी रोज रात्री झोपताना काहीतरी वाचण्याची सवय लावावी - संदीप खर्डेकर.

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे पुस्तक महोत्सवात आज " शांतता पुणेकर वाचत आहेत " ह्या उपक्रमात उद्यम विकास सहकारी बँकेचे कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते.

नागरिकांनी रोज रात्री झोपताना काहीतरी वाचण्याची सवय लावावी आणि ती प्रत्यक्ष पुस्तक वाचण्याची असावी, मोबाईल नव्हे असे आवाहन संदीप खर्डेकर यांनी केले. उद्यम सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आज ह्या उपक्रमात सहभाग घेतला त्यावेळी ते बोलत होते.




यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक संदीप खर्डेकर, संचालक गोकुळ शेलार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू, पतित पावन संघटनेचे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळमकर व कर्मचारी वर्ग यांनी सहभाग घेतला.




यावेळी प्रसिद्ध लेखक हेक्टर गार्सीया यांचे "इकीगाई", डॉ. उदय कुलकर्णी यांचे "नानासाहेब पेशवा एक विलक्षण कालखंड",चंद्रशेखर गोखले यांचा कविता संग्रह, रॉबर्ट कियोसाकी यांचे "Rich dad poor Dad",पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे "एकात्म मानववाद",डॉ. दत्ता कोहीनकर यांचे "सुखी जीवनाची गुरुकिल्ली", विश्वास नांगरे पाटील यांचे "कर हर मैदान फतह ", तुषार रंजनकर व नवनाथ जगताप यांचे " मोबाईल व्यसनमुक्ती " यासह विविध विषयांवरील पुस्तकांचे वाचन करण्यात आले. यापुढे रोज रात्री काही न काही वाचूनच झोपण्याचा निर्धार देखील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.




या उपक्रमात प्रामुख्याने मनोज शिंदे,सौ.इंद्रायणी रड्डी,सौ.शुभांगी कडू,सौ. शुभांगी माकर,सौ. प्रियांका मेलगे,विनायक पडवळ, सुरेंद्र यादव,कु. वैभवी शिंदे,इ सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे संयोजन संदीप खर्डेकर यांनी केले.


Post a Comment

0 Comments