मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिम भारत विचार
दिनांक ९ डिसेंबर २०२५, पुणे
ईव्हीएम, मतदार यादीच्या घोळानंतर आता राज्यातील विशेषत: पुणे जिल्ह्यातील बिबट्या राजकारणाच्या जाळ्यात अडकलाय. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर बिबट्यांचा शहरी वावर, हल्ले वाढले आणि त्यांना पकडण्यासाठीचा प्रशासनावरील ताण देखील वाढला. आतापर्यंत पुणे शहरात न भेडसावणारी समस्या या निमित्ताने समोर आल्याने यात राजकारणाचा 'गंध' येतोय, असा संशय बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी, माजी नगरसेवक डॉ.हुलगेश चलवादी यांनी मंगळवारी (ता.९) व्यक्त केला.
गेल्या पाच दशकांमध्ये बिबट्यांचा शहरी वावर आणि हल्यासंदर्भात ऐकायला मिळत नव्हते. पंरतु, चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहुल लागताच बिबट्या बाहेर पडले का? असा गंभीर सवाल डॉ.चलवादींनी उपस्थित केला. वन विभागाची एवढी मोठी यंत्रणा असतांना आजपर्यंत बिबट्यांची संख्या आणि वावर का आटोक्यात आला नाही? खरोखर सर्व जंगले नष्ट झाली आहेत ? पुण्याचा निसर्ग धोक्यात आहे का? असा सवाल उपस्थित करीत नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने यासंदर्भात उत्तर देत; भयभीत पुणेकरांना सुरक्षेची हमी द्यावी, अशी मागणी डॉ.चलवादी यांनी केली.
पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा शहरी, अर्ध-शहरी भागातील शिरकाव धोक्याच्या टोकाला पोहोचला असताना, प्रशासन ‘कागदी उपाययोजना’ आणि सत्ताधारी राजकारणात गुंतलेले आहेत. शिरूर, जुन्नर, आंबेगाव ते पुणे शहरातील औंध, बावधान, विमानतळ परिसर-सगळीकडे बिबट्यांचे दर्शन वाढत आहे; मात्र प्रभावी प्रतिबंधक उपाययोजना कुठेच दिसत नाहीत.मानवी विस्तारामुळे बिबट्यांची नैसर्गिक अधिवास नष्ट झाले, ऊस शेतीत बिबट्यांना मिळणारा आसरा, शहरातील भटकी कुत्री त्यांचा आहार बनतो. ही मूळ कारणे दूर करण्यासाठी सरकारकडे ठोस योजना नसल्याने मानव-बिबट्या संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होतोय असे मत डॉ.चलवादींनी व्यक्त केले.
.jpg)
Post a Comment
0 Comments