मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
प्रकल्पात बाधित झोपडीधारकांना पर्यायी घरे दिल्याशिवाय हटवू देणार नाही - भगवानराव वैराट,
मुळा मुठा नदीपात्राच्या लगत वसलेल्या ताडी गुत्ता झोपडपट्टी येरवडा येथील झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या शाखेच्या उद्घाटन नुकतेच संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. भगवानराव वैराट यांच्या हस्ते करण्यात आले.
ताडी गुत्ता झोपडपट्टी ही मुळा मुठा नदीपात्राच्या लगत असल्याने पावसाळ्याच्या कालावधीत वारंवार पूर नियंत्रणाच्या कक्षेत आल्याने जीव हानी आणि मालमत्तेची नुकसान होऊ नये, म्हणून तात्पुरते स्थलांतरित करून पावसाळा संपला की पुन्हा झोपड्यातील बिराडे पूर्वीच्या जागेवर संसार थाटतात. त्यांचा कायमचा निवारा पक्या घरात होण्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी प्रकल्पात बाधित होणाऱ्या झोपडीधारकांना पर्यायी पुनर्वसन झाल्याशिवाय झोपड्या हटवू देणार नाही, असा इशारा देखील श्री वैराट ह्यांनी दिला .
सामाजिक चळवळीच्या नेत्या प्राध्यापक आसमा शेख म्हणाल्या की, गोरगरिब झोपडपट्टीवासीयांची राहणीमान उंचवण्यासाठी चांगली घरे देऊन पुणे शहर झोपडपट्टी मुक्त करावे, असे त्यांनी विचार मांडले,
यावेळी कामगार सुरक्षा दलाचे सरचिटणीस काशिनाथ गायकवाड, राज्यसंघटिका सुरेखा भालेराव, दिना शेखर, पुणे शहर अध्यक्ष गणेश लांडगे, गुलशन शेख, आयुब शेख,राजश्री चव्हाण, आदि उपस्थित होते,
.jpg)
Post a Comment
0 Comments