मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे..प्रतिनिधी...
सातत्याने भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करीत आहे या निच प्रवृत्तीच्या निषेधार्थ कोथरूड विधानसभा युवक कॉंग्रेस व पुणे शहर युवक काँग्रेसच्या वतीने तर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक, कोथरूड गावठान, कोथरूड येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे आयोजन पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा सौरभ दादा अमराळे यांच्या नेतृत्वाखाली कोथरूड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मा राज जाधव यांनी केले होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अभय जी छाजेड, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा सौरभ अमराळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस मा. अक्षय जैन, प्रशांत वेलणकर, शहर सरचिटणीस तुषार पठारे, पुणे शहर युवक काँग्रेस सरचिटणीस हर्षद हांडे, शहर सचिव यश कोलते पाटील अमोल काळे, निहार शेख, हिमांशू इंगोले, कुंदा ताई विभूते, सागर नेरे, गणेश रेड्डी, संकल्प कोंडेकर, मंथन सपकाळ, विकास काटे, हर्षल वाघमारे, गणेश मांडके साहिल दळवी व कोथरूड विधानसभा युवक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments