Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय सहकारी संस्थांमध्ये वाढला महाराष्ट्राचा सहभाग - केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची राज्यसभेत माहिती

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


नवी दिल्ली/पुणे (प्रतिनिधी) : 'राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड' (एनसीईएल), 'राष्ट्रीय सहकारी सेंद्रिय लिमिटेड' (एनसीओएल) आणि 'भारती बीज सुरक्षा व सेवा लिमिटेड' (बीबीएसएसएल) या तीन महत्त्वाच्या राष्ट्रीय सहकारी संस्थांमध्ये महाराष्ट्राचा सहभाग वाढत असून, त्याचा थेट लाभ राज्यातील शेतकरी व सहकारी संस्थांना होत असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज राज्यसभेत दिली. डॉ. अनिल बोंडे यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.


मोहोळ म्हणाले, "देशातील आठ लाख सहकारी समित्यांपैकी सव्वा दोन लाख समित्या महाराष्ट्रात आहेत. देशाच्या सहकार क्षेत्रात  महाराष्ट्र आघाडीवर आहे. एनसीईएल, एनसीओएल, बीबीएसएसएल या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठा विस्तार होत आहे. 'एनसीईएल' आणि 'एनसीओएल'मध्ये राज्यातील अनुक्रमे अकराशे आणि तीनशेहून अधिक सहकारी संस्था सामील असून, बीबीएसएसएलशी पाच हजारांहून अधिक संस्था जोडल्या गेल्या आहेत."


महत्त्वाचे मुद्दे 


* 'एनसीओएल'ने  'डॉ. पंजाबराव देशमुख कृषी मिशन'अंतर्गत 11 संस्थांसोबत सामंजस्य करार

* त्यामुळे सेंद्रिय हरभरा, तूर आणि इतर कृषी उत्पादनांच्या खरेदीस चालना 

* 'एनसीईएल'मार्फत सहकारी संस्थांकडून केळी, कांदा, हळद, अनार आणि द्राक्ष यांसारख्या उत्पादनांची निर्यात

* 'बीबीएसएसएल'चे पारंपरिक बियाण्यांचे संरक्षण, संवर्धन आणि त्यांच्या प्रसारासाठी टिश्यू कल्चर प्रयोगशाळा उभारण्यावर मोठे काम



 

Post a Comment

0 Comments