मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालायत नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने आयोजित पुणे बुक फेस्टिवलमध्ये, विशेष पारपत्र मोबाईल सेवा केंद्राची सुविध
by PIB मुंबई
पुणे, 11 डिसेंबर 2025
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था असलेल्या नॅशनल बुक ट्रस्टच्यावतीने पुण्यात, पुणे बुक फेस्टिवलचे या पुस्तक प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात येत्या 13 डिसेंबर 2025 पासून ते 21 डिसेंबर 2025 दरम्यान हा पुस्तक प्रदर्शन विषयक उपक्रम होईल. पुणे बुक फेस्टिवलचे यंदाचे हे तिसरी पर्व आहे. या निमित्ताने, पुण्यातील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाच्या वतीने पारपत्र कार्यालय तुमच्या दारी या त्यांच्या नागरिक केंद्रित उपक्रमाअंतर्गत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात पासपोर्ट व्हॅन – पुणे बुक फेस्टिवल हा पासपोर्ट मोबाईल सेवा केंद्र विषयक उपक्रम राबवला जाणार आहे.
पुण्यातील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाचक, लेखक, विद्यार्थी आणि नागरिकांना पारपत्राशी संबंधित सेवा सुविधा सुलभरित्या उपलब्ध करून देणे आणि त्यांना पारपत्रासाठीच्या भेटींची लवकरात लवकरची वेळ मिळवून देणे हा या या विशेष प्राचार प्रसार विषयक संपर्क उपक्रमाचा उद्देश आहे.
पासपोर्ट मोबाईल सेवा केंद्र खाली नमूद तारखा आणि ठिकाणांना उपलब्ध असेल
दिनांक: 13 ते 20 डिसेंबर 2025
ठिकाण: नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय मार्ग, पुणे – 411004 इथे आयोजित फर्ग्युसन महाविद्यालयातील पुणे बुक फेस्टिवल.
वेळ: 08:30 ते 17:30 वाजेपर्यंत (अर्जदारांनी त्यांच्या ऑनलाइन अर्जाच्या पावतीवर नमूद केलेल्या निर्धारित भेटीच्या वेळेपूर्वी 15 मिनिटे आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे.)
मोबाईल व्हॅन भेटीची वेळ कशी निश्चित करावी:
पासपोर्ट इंडियाच्या संकेतस्थळाला भेट द्या (https://www.passportindia.gov.in) आणि सामान्य योजनेअंतर्गत अर्ज दाखल करा.
ऑनलाइन शुल्क भरल्यानंतर, 'भेटीची वेळ निश्चित करा' (Schedule Appointment) या पानावर जा, ठिकाण म्हणून मोबाईल व्हॅन निवडा आणि भेटीची वेळ निश्चित करा.
आवश्यक दस्तऐवज :
अर्जदारांना विनंती आहे की त्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रौढ आणि अल्पवयीन अर्जदारांसाठी विहित केलेल्या दस्तऐवजांची सूची काळजीपूर्वक वाचावी.
[अर्जदारांच्या सत्यता पडताळण्यासाठी, पारपत्र सपोर्ट कायदा, 1967 चे कलम 5 आणि त्याला धरून पारपत्र नियम, 1980 चा नियम 5 एकत्रितपणे, पारपत्र प्राधिकरणाला अर्ज योग्यरित्या निकाली काढण्यासाठी आवश्यक चौकशी करण्याचा आणि अर्जदाराला अतिरिक्त माहिती किंवा दस्तऐवज सादर करण्याची मागणी करण्याचा अधिकार दिला गेला आहे

Post a Comment
0 Comments