मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
पुणे..
*पुणे शहरात आजपासून शिवसेनेच्या वतीने संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून ही यात्रा हडपसर मतदार संघातील मांजरी बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, मांजरी येथून सायंकाळी ४.३० वाजता सुरू होणार आहे. शिवसेना पुणे शहरप्रमुख मा. प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या संवाद यात्रेच्या माध्यमातून हडपसर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे.*
*सदर संवाद यात्रेत नागरिकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा, स्थानिक समस्या व विकासविषयक मुद्द्यांवर शिवसेनेची भूमिका मांडण्यात येणार असून हा कार्यक्रम सामाजिक-राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार आहे.*
*तरी पुणे शहरातील व हडपसर विधानसभा मतदारसंघातील सर्व सन्माननीय पत्रकार बंधू-भगिनींनी या संवाद यात्रेचे वृत्तांकन करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.*

Post a Comment
0 Comments