Type Here to Get Search Results !

विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे यांचे कायदा कलम 154च्या आदेशाला कुमार समृद्धी सहकारी गृहरचना संस्थेने दाखवली केराची टोपली

            


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार

पुणे दिनांक 11 -


 विश्रांतवाडी, टिंगरेनगर येथील कुमार समृद्धी सहकारी गृहरचना संस्थेतील इमारत ए- 6 व ए -7 या इमारतीतील 96 सदनिका धारकांनी करोडो रुपये रकमेला सदनिका विकत घेतल्या नियमानुसार संबंधित संस्थेच्या संचालक मंडळाने त्यांना सभासद करून घेतले नाही. कायद्यानुसार 96 सदनिका धारकांना सभासद करून घेणे क्रमपात्र होते, मात्र संबंधित संस्थेच्या संचालक मंडळाने सदनिका धारकांनी उपनिबंधक सहकारी संस्था पुणे शहर (5) यांचे कडे याबाबत तक्रार दाखल केली मात्र संबंधित उपनिबंधक श्री आघाव यांनी सभासदत्व करून घेण्यास नकारात्मक व चुकीचा आदेश पारित केला.


 त्यामुळे संबंधित सभासदांनी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा कलम 154 अंतर्गत विभागीय आयुक्त सहकारी संस्था पुणे यांच्याकडे अपील दाखल केले संबंधित अपीलावर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था पुणे यांनी 96 सभासदांना सभासद करून घेण्याबाबत 25/7/ 2024 रोजी आदेश पारित केला


 संबंधित आदेशाला संस्थेचे चेअरमन राजाराम साळुंखे व इतर संचालक मंडळांनी केराची टोपली दाखवली म्हणून आज रोजी लोकशासन पार्टी ऑफ इंडियाचे वतीने सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयासमोर सभासद करून, घेणे भागदाखल देणे , आय व जे रजिस्टर मध्ये नोंदी करणे, संबंधिताचे पाणी चालू करणे, संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती करणे ,तसेच सदर संचालक मंडळाची चौकशी करून संबंधित संस्थेविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणे या मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन व आमरण उपोषण करण्यात आले. सदर आंदोलनास बहुजन समाज पार्टी  यांनी जाहीर पाठिंबा दिला .

Post a Comment

0 Comments