Type Here to Get Search Results !

मॉडर्न हायस्कूल, अँग्लो उर्दू संघाचे विजय खासदार क्रीडा महोत्सवातील सॉफ्टबॉल स्पर्धेला जल्लोषात सुरुवात

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे, ता. १४ – मॉडर्न हायस्कूल, अँग्लो उर्दू स्कूल यांनी केंद्रिय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधऱ मोहोळ यांच्या पुढाकाराने होत असलेल्या पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवातील सॉफ्टबॉल स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.



सर परशुराम महाविद्यालयात ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू आणि सिने अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते झाले. या वेळी कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रीय खेळाडू आणि सिने अभिनेते रमेश परदेशी, मोनिका मुरलीधर मोहोळ, स्पर्धा संयोजन समिती प्रमुख मनोज एरंडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू योगेनकुमार आशेर, राजेंद्र मिसाळ, अनिरुद्ध शर्मा उपस्थित होते. 



स्पर्धेत वीस मुलांचे संघ आणि वीस मुलींचे संघ अशा चाळीस संघांनी सहभाग नोंदवलेला आहे. या स्पर्धेच्या सामन्याची सुरुवात डी. ई. एस टिळक स्कूल आणि अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल या दोन संघादरम्यान झाली. अँग्लो उर्दू स्कूलने डी. ई. एस स्कूलचा १९-१३ असा पराभव करून विजयी सलामी दिली. यात उमर हन्नुरे याने चार होम रन, कृष्णराज याने तीन होम रन करून उत्कृष्ट असा खेळ केला. दुस-या सामन्यात बी. व्ही. बी स्कूलने पी. इ. एस. मॉडर्न हायस्कूलचा १६-०३ रन असा पराभव करून बाजी मारली. या सामन्यात बी. व्ही. बी.च्या फरहान शेख याने तीन होम रन, पार्थ लोखंडेने चार स्ट्राईक आउट घेतले. पी. इ. एस.च्या कौशलने एक होम रन असा स्कोअर केला. 




तिसरा सामना मॉडर्न हायस्कूल पुणे आणि पी. ए. इनामदार स्कूल यांच्यात झाला आहे. मॉडर्न शिवाजीनगर संघाने पी. ए. इनामदार स्कूलचा १९-१२ रन असा पराभव केला. या सामन्यात आदित्य कुंभार, तेजस गुगळे, समर्थ पवार, मंथन पवार यांनी उत्कृष्ट खेळी केली. पी. ए. इनामदार स्कूलच्या अशरफ कुरेशी याने दोन होम रन आणि उत्कृष्ट पिचिंग केली.

मुलींच्या सामन्यात बी. व्ही. बी. आणि पी. इ. एस मॉडर्न हायस्कूल आमनेसामने आले होते. मॉडर्न संघाने बी. व्ही. बी. संघाला १८-११ अशा स्कोअरने पराभूत केले.

Post a Comment

0 Comments