मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधीकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे..प्रतिनिधी .
संतुलन पाषाण शाळेतील विद्यार्थांचा बालदिन मोठ्या आनंददायी वातावरणात गंम्मत जम्मन मेळावा संपन्न झाला. वाघेश्वरनगर नगर येथील कचराडेपो हटवल्यानंतर अँड बी.एम. रेगे यांनी पंधरा दिवसाचा बेमुदत अन्न त्याग सत्याग्रह केला त्याच ठिकाणी मोठ्या उत्सावात कलात्मकतेच्या उंचीवर गंमत जंमत बाल आनंद मेळावा साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन गरुड, भाजप युवा मोर्चा हवेली तालुका अध्यक्ष अनिल सातव, राष्ट्रवादी कॉग्रेस ( शरदचंद्र पवार गट) सरचिटणीस पुणेशहर प्रकाश जमदाडे, भिम आर्मी पुणे शहर उपाध्यक्ष सतिश भाऊ ढोले, अँड. बी.एम. रेगे अँड पल्लवी रेगे आदींच्या उपस्थितीत दीपक प्रज्वलन व पंडित नेहरू च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उदघाटण करण्यात आले. याप्रसंगी मुलांसाठी जादूगार ईश्वर यांचे जादूचे प्रयोग, चारलीन चापलीन शो, स्टार मेलेडी आर्केस्ट्रा यांची बहारदार गीते सादर करून मनोरंजन करण्यात आले. ज्या ठिकाणी पूर्वी कचरा डेपो होता त्या ठिकाणी आज मुलांचे अलोट गर्दीमुळे नंदनवन पहावयास मिळाले. याप्रसंगी तुळजाभवानीनगर, वाघेश्वर नगर, गाडीतळ, सुयोग नगर, गोरे वस्ती येथील सर्व पाषाण शाळांनी कला गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करून उपस्थित आमचे मनोरंजन केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष अर्जुन भाऊ गरुड यांनी संतुलनाचा तीस वर्षाचा संघर्ष आम्ही पाहत असून येथून पुढील ही काळात पाठीशी राहण्याचे प्रतिपादन केले
भाजप युवा मोर्चाचे अनिल सातव यांनी राजकारणी हे स्वार्थी असतात मात्र रेगे भाऊंचा प्रवास निस्वार्थी असल्याचे मत मांडून ते मार्गदर्शन व गुरु असल्याचे वही दिली. राष्ट्रवादी सरचिटणीस प्र काश जमदाडे यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या संचालिका एडवोकेट पल्लवी रेगे यांनी संतुलन महिला दगडफान कौशल्य विकास भावनांमध्ये विविध कौशल्य आधारित कोर्सेस घेण्यात असे मत मांडले. एडवोकेट बी एम रेगे यांनी पुढील काळात मुलांसाठी आधुनिक शिक्षणाचे केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मुलांना खाऊ आणि बक्षीस वाटप करून गौरव करण्यात आला



Post a Comment
0 Comments