मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे..प्रतिनिधी...
वाघोली येथील वाघेश्वर नगर या खाणकामगार वस्तीवर जमीन हक्क मागणीसाठी चालू असलेल्या सत्याग्रहाला दहाव्या दिवशी जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठक ठोस निर्णया अभावी असफल झाल्याने सत्याग्रह चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीमध्ये निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम, प्रांत अधिकारी यशवंत माने अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते खनिकर्म महसूल अधिकारी सुरेश जगताप, मालमत्ता विभाग कनिष्ठ लिपिक गीते साहेब गटविकास अधिकारी शेखर शेलार मंडल अधिकारी रुपाली सरपदे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिका-यांनी ठोस निर्णय न घेता सोमवार दिनांक 27 ऑक्टोबर 2025 रोजी महानगरपालिका आयुक्त समवेत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. बैठकीत वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments