Type Here to Get Search Results !

जय अंबामाता संस्थेच्या उपक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिसाद* *नवरात्र उत्सव निमित्त दांडिया व होम मिनिस्टर कार्यक्रमास महिलांची पसंती*

 



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे -जय अंबामाता स्वयंरोजगार संस्थेच्या वतीने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा उसा उमटविणाऱ्या नवदु‌र्गाचा यथोचित गौरव, कन्यापूजन, आरोग्य शिबिर, मनोरंजनाच्या कार्यमांसह स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आरतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.


या प्रसंगी सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा उत्तुंग ठसा उमटविणाऱ्या भवदुर्गाचा गौरव करण्यात आला. या वेळी 'नारी ही प्रत्येक घराची शक्ती आहे, तिला आदर, प्रेम, माया द्या,' असा संदेश देणाऱ्या नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. उपस्थित पाहण्यांनी स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले.


नवरात्रातील अष्टमीचे औचित्य साधत कन्यापूजन झाले. इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे मसाज थेरपी हा उपक्रम



राबविण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन खडक पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिता तोंडे यांच्या हस्ते झाले. या उपक्रमासाठी श्री श्री आनंद वर्गाचे संस्थापक प्रशांत शिळीमकर, राहुल साळुंखे, डॉ. राजेंद्र भवाळकर, शिवाजी धुमाळ, रवींद्र नागुल यांचे विशेष सहकार्य लाभले. दृष्टिहीन कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन प्राप्त व्हावे, या उद्देशाने 'सुरसंगम स्वराली' हा कार्यक्रम घेण्यात आला.


सर्व उपक्रमांच्या यशस्वितेसाठी संस्थेच्या अध्यक्ष मंगल नागुल, स्वप्ना वारुळे, नम्रता नागुल, स्नेहल भिकुले, मनीषा शिळीमकर, मनीषा मांजरे, सुचिता नागुल, रूपाली मांजरे, रसिका नागुल, मनीषा कुबेर, सुचेता नागुल, संगीता क्षीरसागर, राजश्री सोनटक्के आदींनी विशेष परीश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments