मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे...प्रतिनिधी ..
पुण्यातील जैन होस्टेल प्रकरणात लढत असताना पहिल्याच दिवशी पुणेकरांना व जैन समाजाला एक शब्द दिला होता की, या होस्टेलची एक वीट देखील कोणाला हलवू देणार नाही.
मंत्रीपदाचा दबाव आणि शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून करण्यात आलेला हा व्यवहार प्रचंड राजकीय दबावामुळे अखेर रद्द झाला. या संपूर्ण काळात कुठल्याही प्रकारचा संभ्रम नको या हेतूने मी या हॉस्टेलच्या आवारात आलो नाही.
परंतु काल जैन मुनींनी केलेल्या आवाहनाप्रमाणे आज येथे मनोभावे दर्शन घेतले. निश्चितच हा व्यवहार रद्द होण्याची घोषणा म्हणजे हा संघर्ष थांबला आहे असे मुळीच नाही. खऱ्या अर्थाने ज्या दिवशी या ठिकाणी भगवान महावीरांचे भव्य मंदिर उभे राहील आणि या वास्तूमध्ये पुन्हा एकदा मुलांसाठी सर्व सुविधानियुक्त होस्टेल सुरू होईल, त्याच दिवशी खरे या लढाईला यश आले असे मानले जाईल.



Post a Comment
0 Comments