Type Here to Get Search Results !

मदत नव्हे... कर्तव्य! पूरग्रस्त भागांसाठी मातंग एकता आंदोलन ची जीवनावश्यक मदत मोहीम

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे ...प्रतिनिधी...

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे अनेक कुटुंबे संकटात सापडली आहेत. या कठीण काळात मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेने पुढाकार घेत, पूरग्रस्त भागांतील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे कार्य हाती घेतले आहे.


गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या मदत मोहिमेत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील अनेक पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.या उपक्रमात आतापर्यंत १३०० ते १४०० कुटुंबांना अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले असून, उद्या या मोहिमेचा शेवटचा टप्पा धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यात, व  सोलापूर चे माढा तालुका  येथे एकूण १३०० कुटुंबियांना मदत कार्य पार पडणार आहे. याअंतर्गत आजवर २ ते २.५ हजार नागरिकांपर्यंत ही मदत पोहोचविण्याचे नियोजीत कार्य पूर्ण झाले आहे.



मातंग एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा रमेशदादा बागवे  यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य अखंड सुरू होते, अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.


या उपक्रमात राज्य समन्वयक श्री. विठ्ठल थोरात, सचिव अरुणजी गायकवाड, पुणे शहर पदाधिकारी दयानंद अडागळे, सुनिलजी बावकर, मारुती कसबे, मोसीन खान, कुमार अडागळे, महिला आघाडीच्या सुरेखाताई खंडागळे, राजश्रीताई अडसूळ, जयदीप शेलार, विलास कांबळे तसेच औद्योगिक आघाडीचे अध्यक्ष पप्पूजी जाधव, आदित्य गायकवाड, हुसेन भाई शेख, विवेक बागवे, विजय लांडगे यांनी व त्यांच्या टीम ने  मोलाचे सहकार्य केले आहे.



या संपूर्ण मदत मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे, कुठलाही दिखावा किंवा प्रसिद्धीचा हेतू न ठेवता, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडले. ‘मदत नव्हे, कर्तव्य’ ही संघटनेची भूमिका या मोहिमेत स्पष्टपणे जाणवली.


हे संपूर्ण अभियानाची संकल्पना संघटनेचे राज्याचे कार्याध्यक्ष, व  पुणे म न पा चे नगरसेवक श्री. अविनाश रमेशदादा बागवे यांची होती, व ती योग्य समन्वय साधून यशस्वीरित्या पूर्ण देखील केली

Post a Comment

0 Comments