Type Here to Get Search Results !

विद्यानगर येथील चलवादी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने 'वारसा परंपरेचा ,संस्कृती व अभिमानाचा ; कोकणातील सुप्रसिद्ध शक्ती - तुरा जंगी सामन्याचे आयोजन

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 

प्रतिनिधी....

  पुणे दि.६ -  विद्यानगर येथील चलवादी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने 'वारसा परंपरेचा ,संस्कृती व अभिमानाचा ; कोकणातील सुप्रसिद्ध शक्ती - तुरा जंगी सामन्याचे आयोजन

  स्वप्नील शिर्के यांच्या वतीने येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक हॉल येथे करण्यात आले होते भानुदास घराण्यातील शक्तीवाल्या शाहीर वृदाली दळवी (महाडिक) व विजय राजेंद्र यांचे तुरेवाले  श्री रत्नाकर महाकाळ यांच्या जंगी सामन्यास रसिकांनी भरभरून दाद दिली. 



कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष डॉ. हुलगेश  चलवादी , उपाध्यक्ष एडवोकेट रेणुका चलवादी , माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव तसेच पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील कोकणस्थ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .शिर्के व चलवादी परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा व कलाकारांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल भोसले, सुनील मोरे ,शिल्पा साळुंखे, आकाश चलवादी, यशवंत शिर्के, रुपेश पारटे, सुनील शिर्के ,विजय शिंदे , कृष्णा साळवी आदींनी विशेष सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments