मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
प्रतिनिधी....
मुंबई दि.6 ~ भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधीश भूषण गवई यांच्यावरील झालेल्या हल्ल्या चा प्रयत्न हा निंदनीय आहे.या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. सरन्यायाधीशांवरील हल्ला हा संविधानावरील ; लोकशाहीवरील न्याय प्रिय प्रत्येक नागरिकावर हा हल्ला आहे.हल्लेखोराने केलेला हल्ल्याचा प्रयत्न हा राष्ट्रद्रोह ठरवून त्या आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
ना.रामदास आठवले यांनी केली आहे.
न्यायपालिका हा लोकशाहीचा प्राण आहे.संविधानाचा प्राण आहे. सरन्यायाधीशांवरील हल्ला हा
न्यायपालिकेवरील हल्ला हा लोकशाहीच्या प्राणावर केलेला हल्ला असून हा हल्ल्याचा प्रकार राष्ट्रद्रोह ठरविला पाहिजे असे आपले मत असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.
चातुर्वर्णातून आलेला वर्णभेद जातीभेद महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून संपविला आहे.तरीही काही लोकांच्या मनातून जातीभेद; वर्णभेद; भेदभाव गेलेला नाही. त्याच जातीवादी भावनेतून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला करण्याचा निंदनीय प्रयत्न झाला आहे. सरन्यायाधीशांवरील हल्ला हा संविधान लोकशाही आणि समता या संविधानिक मूल्यांवरील; न्यायव्यवस्थेवरील हल्ला आहे.हा राष्ट्रद्रोह ठरवा असा गुन्हा आहे .गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments