मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे ..प्रतिनिधी..
हडपसर मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या तातडीने व तत्काळ सोडविता याव्या याकरिता महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री, कॅबिनेटमंत्री मा. उदयजी समंत साहेब यांच्या हस्ते हडपसर विभागात अत्याधुनिक 'शिवसेना कंटेनर शाखांचे' भव्य उद्घाटन तसेच नवीन ॲम्बुलन्स चे लोकार्पण करण्यात आले.
शिवसेनेच्या गटप्रमुख आणि शाखाप्रमुखांद्वारे नियमित संपर्क अभियान राबविण्यात येणार असून शिवसेनेच्या धोरणांचा प्रभावी अंमलबजावणीचा संकल्प,संघटन मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञान व नवसंसाधनांचा वापर करण्यात येणार आहे तसेच नागरिकांचा आवाज पोहोचवणारा एक सक्षम आणि सक्रिय मंच या अत्याधुनिक कंटेनर शाखांच्या माध्यमातून निर्माण होणार आहे यावेळी समवेत पुणे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर, गाडीतळ शिवसेना शाखा उपशहर प्रमुख दत्ता खवळे विभाग प्रमुख, सुनील मुंजे उपविभाग प्रमुख, अनिल हावळे शाखाप्रमुख, अनिकेत सपकाळ, कुणाल वाघ, विशाल मिरेकर, दादा साळुंखे आकाश खिलावे, राहुल भोवाळ, विशाल भोपळे,विजय खवळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments