Type Here to Get Search Results !

पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी केंद्र सरकारकडे विनंती!

 



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच अहमदनगर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांची वाढती लोकसंख्या आणि न्यायप्रकरणांची संख्या पाहता, पुणे येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करणे अत्यावश्यक झाले आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयातील सुमारे ४५% प्रकरणे या भागांतील असून, नागरिकांना न्यायासाठी मुंबईपर्यंत जावे लागते, ज्यामुळे वेळ, पैसा व मानसिक त्रास सहन करावा लागतो. नागपूर व औरंगाबादप्रमाणे पुण्यातही खंडपीठ झाल्यास न्याय मिळण्याची प्रक्रिया सुलभ व जलद होईल. त्यामुळे, पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ त्वरीत स्थापन करावे, अशी नम्र विनंती माननीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), विधी व न्याय मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडे करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments