Type Here to Get Search Results !

शिवराज मोरे दादा यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही केवळ एक व्यक्तीची नेमणूक नाही, तर संपूर्ण संघर्षशील विचारांचा विजय आहे- श्री प्रथमेश आबनावे



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


प्रतिनिधी...

शिवराज दादा यानी गावोगाव फिरून, कार्यकर्त्यांच्या मनात घर करत, पक्षाच्या विचारांची मशाल खऱ्या अर्थाने उजळवली. प्रत्येक आंदोलनात अग्रभागी राहणारा, प्रत्येक कार्यकर्त्याच्या अडचणीत पाठिशी उभा राहणारा, आणि आजच्या युवांना न्याय, संधी व संविधानाचा गर्व वाटावा यासाठी नेहमी आवाज उठवणारा नेता… आज अधिकृतपणे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेतृत्व करत आहे, ही बाब अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे.


त्यांच्या  डोळ्यात नेहमी विचारांचं तेज, हृदयात कार्यकर्त्यांचं प्रेम, आणि कृतीत संविधानाचं भान असलेला हा नेता म्हणजे आजच्या राजकारणातला नवा प्रकाशपुंज आहे.


 तुमच्या या नव्या प्रवासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा शिवराज दादा…

युवकांचा आवाज बुलंद करणं, हीच तुझी खरी निवडणूक आहे, आणि ती तुम्ही यशस्वीपणे जिंकाल  याची आम्हाला खात्री आहे.

Post a Comment

0 Comments