मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे (प्रतिनिधी) :
मातंग समाज समन्वय समिती, पुणे यांच्यावतीने दिला जाणारा ‘रिपब्लिकन नेते स्वर्गीय हनुमंत साठे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ यंदा डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया, पुणे चे जनरल सेक्रेटरी मा. विशाल शेवाळे यांना प्रदान करण्यात आला. विशेषतः १ ऑगस्ट – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५व्या जयंतीच्या शुभदिनी, सारसबाग, पुणे येथे माजी राज्यमंत्री मा. दिलीपभाऊ कांबळे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक, सर्व पक्षांचे नेते, रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्ते तसेच अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मातंग समाज समन्वय समितीचे अध्यक्ष वीरेंद्र साठे, सुरेश अवचिते, दादाभाऊ वारभुवन, इकबाल शेख यांचेही कार्यक्रम आयोजनात विशेष सहकार्य लाभले.
डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष मा. डी. टी. रजपूत, संस्थेतील प्राचार्य, प्राध्यापकवर्ग
याप्रसंगी डीसीएम सोसायटीचे खजिनदार सिद्धार्थ शेवाळे, मुख्याध्यापिका शिल्पा भोसले आणि वरुण भोसले हेही विशेष उपस्थित होते.
या पुरस्काराद्वारे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विशाल शेवाळे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची अधिकृत दखल घेण्यात आली. वंचित, शोषित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी त्यांनी उभारलेले शिक्षणाचे पर्याय आणि समाजकार्य, हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख ठरली आहे.
या सन्मानप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. रामदासजी आठवले यांनी भ्रमणध्वनीद्वारे शेवाळे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 💐💐💐💐



Post a Comment
0 Comments