मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे प्रतिनिधी ...
अजूनही "समता" केवळ कागदावरच!
मातंग एकता आंदोलन राज्यव्यापी संघटनेच्या वतीने कोथरूड पोलीस स्टेशन येथे अनुसूचित जातीतील महिलेला जातीवाचक अपशब्द व अमानुष वागणूक दिल्या गेलेल्या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
ही घटना म्हणजे आजही समाजात व व्यवस्थेत खोलवर रूजलेला जातीभेद व विषमता जिवंत असल्याचा धक्कादायक पुरावा आहे. "समता" हा शब्द अजूनही केवळ संविधानात, भाषणात, आणि कागदावरच आहे... मनात मात्र अजूनही विषाचा ठेवा!
या संदर्भात मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष मा. अविनाशजी रमेशदादा बागवे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे सर्व पदाधिकारी, समन्वयक, महिला आघाडीच्या अध्यक्षा व विविध जिल्ह्यांतून आलेले कार्यकर्ते यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार आणि महिला संरक्षण कायद्यानुसार तात्काळ कारवाई करावी, अशी लेखी मागणी केली. तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्याला सेवेतून कायमस्वरूपी निलंबित करावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.
अन्यथा, मातंग एकता आंदोलन संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.
ही केवळ एका व्यक्तीची नाही, तर संपूर्ण समाजाच्या आत्मसन्मानाची लढाई आहे. अन्याय करणारा कोणताही असो त्याला माफ केला जाणार नाही!
यावेळी मा विठ्ठलजी थोरात समन्वयक महा राज्य, मा आरुणजी गायकवाड सेक्रेटरी महा, राज्य, मा. राजेश्रीताई अडसूळ अध्यक्षा महिला आघाडी पुणे, मा सुरेखाताई खंडाळे सरचिटणीस, मा अनिलजी हातागळे अध्यक्ष लहुजी समता परीषद, मा. रमेशजी सकट उपाध्यक्ष, मा. दयानंद अडागळे उपाध्यक्ष, मा. सुनिल बावकर प्रदेशाध्यक्ष सोशल मीडिया, मा. रमाकांत साठे, मा.रवि पाटोळे स्वीकृत सदस्य, मा. सय्याजी कदम, मा.हुसेन शेख, मा.सुनिल साळवे, मा.राहुल चिदम यांनी उपस्थिती लावली.


Post a Comment
0 Comments