Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ च्या उन्नयनाची मागणी - केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांची भेट! केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ चे रुंदीकरण व उन्नयन करण्याची तातडीची आवश्यकता याबाबत सविस्तर चर्चा खासदार श्री श्रीरंग बारणे यांनी केली

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


प्रतिनिधी....

आपल्या नेतृत्वाखाली देशभरात रस्ते व वाहतूक क्षेत्रात जे ऐतिहासिक व क्रांतिकारी बदल घडून येत आहेत, ते निश्चितच उल्लेखनीय आहेत. त्याच अनुषंगाने, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला, जो पश्चिम भारताच्या औद्योगिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे.


१. पुणे हे महाराष्ट्राच्या मध्यवर्ती ठिकाणी असून कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर व नाशिक यांसारख्या शहरांशी जोडणारे राष्ट्रीय महामार्ग आहेत. वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर या मार्गांचे तातडीने रुंदीकरण आवश्यक आहे. यामुळे प्रवास सुलभ होईल, व्यापाराला गती मिळेल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल.


२. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ (मुंबई–पुणे NH-4) व सध्याचा NH-48 हा महत्त्वाचा मार्ग सध्या खराब अवस्थेत असून दुरुस्ती व रुंदीकरणाची तातडीची गरज आहे. रस्त्यांवरील खड्डे व अरुंद लेनमुळे वाहतूक कोंडी व अपघात वाढले आहेत. त्वरित उपाययोजना केल्यास प्रवास सुरक्षित, जलद व सुलभ होईल.


३. कार्ले फाटा, वडगाव फाटा, तळेगाव फाटा आणि देहूरोड फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. उड्डाणपूलांची कमतरता आणि रुंदीकरणाचा अभाव यामुळे या मार्गावर वाहतुकीची स्थिती अधिकच बिकट झाली असून, नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे.


या मार्गांचे विस्तारीकरण, उड्डाणपुलांची निर्मिती व पायाभूत सुधारणा केल्यास पश्चिम भारताचा वेगवान व शाश्वत विकास अधिक सुलभ होईल. या कामांसाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी नम्र विनंतीही यावेळी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments