मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
कॅन्टोन्मेंटच्या समावेश तत्वत: मान्यता आमदार सुनिल कांबळे यांची माहिती
पुणे,दि. १० : महापालिका हद्दीत असलेल्या पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंटबोर्डाचा महापालिकेत समावेश करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. या समावेशाबाबत आज मंत्रालयात बैठक पार पडली
या बैठकीत संरक्षण विभागाच्या प्रस्तावानुसार पुढील तीन महिन्यात विलीनीकरणाची प्रक्रीया पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे आमदार कांबळे यांनी सांगितले. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिध्दार्थ शिरोळे,महापालिका आयुक्त नवल किशोर राम. यांच्यासह दोन्ही बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. तर, संरक्षण विभागाचे अधिकारी दिल्लीवरून ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते. या दोन्ही बोर्डांच्या विलिनीकरणासह कांबळे यांनी सातत्याने राज्यशासनाकडे पाठपुरावा केला होता. महापालिका हद्दीच्या लगत असूनही या भागातील अनेक नागरिकांना मुलभूत सुविधांसाठी अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याने हे विलीनीकरण व्हावे अशी मागणी अनेकदा शासनाकडे केली असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments