Type Here to Get Search Results !

दलित पँथर ही सामाजिक परिवर्तनाची चळवळ; यशवंत नडगम यांचे नेतृत्व क्रांतीशील भविष्यात नक्कीच विचार केला जाईल– *ना. मुरलीधर मोहोळ*


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


*पुणे (दि. ९ जुलै*):

“दलित पँथर ही संघटना केवळ दलितांचा नव्हे तर सर्व वंचितांचा बुलंद आवाज आहे. गेल्या पाच दशकांत या चळवळीने अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहत समाजाला प्रेरणा दिली आहे. यशवंत भुजंग नडगम यांचे नेतृत्व संयमी, अभ्यासपूर्ण आणि क्रांतीशील असून नव्या पिढीला दिशा देणारे आहे असून भविष्यात त्यांच्या राजकीय क्षेत्रात कार्याची निश्चित दखल घेतली जाईल .असे प्रेरणादायी गौरवोद्गार केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी काढले. त्यांनी ‘पँथररत्न’ पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना दलित पँथर संघटनेच्या सामाजिक योगदानाचे व राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले.


दलित पॅंथर संघटनेचा ५३ वा वर्धापन दिन सोहळा बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे अत्यंत दिमाखात व उत्साहात संपन्न झाला. या विशेष प्रसंगी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भुजंग नडगम होते. सुवर्णाताई नडगम, प्रदेशाध्यक्ष (महिला आघाडी) यांच्यासह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत भुजंग नडगम यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,


> “दलित पँथर ही केवळ आंदोलनात्मक नव्हे तर वैचारिक, क्रांतिकारी आणि सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. आजही समतेसाठीचा लढा संपलेला नाही. म्हणूनच नव्या पिढीने ही चळवळ आत्मसात करून संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून अधिक मजबूत करणे गरजेचे आहे.

संविधानिक मूल्यांची जपणूक करत, अन्यायाविरुद्ध निःसंकोचपणे उभे राहाणे हीच खरी पँथरत्वाची ओळख आहे.”

त्यांनी कार्यकर्त्यांना नवा जोम, नवा उत्साह देत संघटनेच्या पुनर्बांधणीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.


नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी आपल्या सखोल भाषणात दलित पँथर चळवळीचे कार्य आणि यशवंत नडगम यांच्या नेतृत्वाबद्दल विशेष गौरवोद्गार काढले. त्यांनी म्हटले –


> “दलित पँथर ही संघटना केवळ दलितांचा आवाज नव्हे, तर समाजाच्या सर्व स्तरातल्या वंचितांचा न्यायासाठीचा बुलंद आवाज आहे.

या चळवळीने गेल्या पाच दशकांपासून अत्याचार, विषमता, आणि अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहत एक प्रेरणास्रोत निर्माण केला आहे.

यशवंत भुजंग नडगम यांचे नेतृत्व संयम, अभ्यास, आणि सर्जनशील क्रांतीची दिशा दाखवणारे आहे.

आज ‘पँथररत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आलेले सर्व मान्यवर हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील दीपस्तंभ आहेत – क्रीडा, कला, समाजकारण, पत्रकारिता, आरोग्य, उद्योजकता या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आदर्श घडवले आहेत.

त्यांच्या कार्यामुळे नव्या पिढीला दिशा मिळेल, आत्मभान मिळेल, आणि समाज परिवर्तनाची प्रेरणा मिळेल.”


ना. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते पुढील मान्यवरांना 'पँथररत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले –


क्रीडा क्षेत्रातील पँथर खेळरत्न पुरस्कार विजेते:


१. वैष्णवी परदेशी

२. दीपक भालेराव

३. प्रा. विजय बेंगळे

४. श्री शिवाजी गोरे

५. श्री शैलेंद्र पोतनीस

६. धनंजय जाधव

७. तकदीर सय्यद

८. वीरू भोजने


कला क्षेत्रातील पँथर गानरत्न पुरस्कार विजेते:


९. साजन बेंद्रे – महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, सामाजिक चळवळीला समर्पित व्हीआयपी गाण्यांचे गीतकार


> त्यांच्या आवाजातली क्रांती, त्यांच्या गीतांमधून उठणारा 'जयभीम'चा हुंकार – हे केवळ संगीत नाही तर समतेच्या लढ्याचे सूर आहेत.

विशाल जाधव यांच्यासोबत ‘बुद्ध भीम गीत’ सादरीकरणाने सभागृहात भारावलेपण निर्माण केले.

१०. विशाल जाधव

११. महेश बनसोडे

१२. प्रकाश भेंडले


समाजभूषण पुरस्कार विजेते:


१३. अनिल आर. इंगळे

१४. अनिल रामटेके

१५. अरुण पवार

१६. रंजन शर्मा

१७. हिम्मतराव जाधव

१८. देवेंद्र भाट

१९. नितीन वाबळे

२०. डॉ. रोहित बोरकर

२१. नदीम कुरेशी


भैरवनाथ कानडे यांना ‘पँथररत्न’ पुरस्कार – उत्कृष्ट निवेदक म्हणून गौरव


या भव्य कार्यक्रमाचे प्रेक्षकांना भावनिक, प्रभावी आणि ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन करणारे भैरवनाथ कानडे यांचा 'पँथररत्न पुरस्काराने' विशेष गौरव करण्यात आला.

त्यांच्या निवेदनातून कार्यक्रमाचे सौंदर्य अधिकच खुलले. प्रत्येक पुरस्कारप्राप्त व्यक्तीची ओळख त्यांनी अत्यंत नेटकेपणाने, शब्दशैलीत सौंदर्य ठेवून आणि संवेदनशीलतेने सादर केली.

त्यांचे निवेदन हा कार्यक्रमाचा खरा आत्मा ठरला, अशी उपस्थितांची प्रतिक्रिया होती.

प्रारंभी भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर व पद्मश्री कवी नामदेव ढसाळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले .

कार्यक्रमाचा समारोप टाळ्यांच्या गजरात झाला.

विविध क्षेत्रात समाजहितासाठी झटणाऱ्या व्यक्तींना ‘पँथररत्न’ पुरस्काराने गौरवून दलित पँथर संघटनेने त्यांच्या संघर्षमय व प्रेरणादायी वाटचालीस मान्यता दिली. कार्यक्रमाचे आयोजन संपूर्णपणे शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि सामाजिक ऐक्य साधणारे ठरले. या कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचे व व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांचे यशवंत भाऊ नडगम यांनी आभार मानले

Post a Comment

0 Comments