Type Here to Get Search Results !

गणेशोत्सवाला महाराष्ट्राच्या राज्याचा अधिकृत महोत्सव म्हणून घोषणा राज्य सरकारच्या निर्णयाचा पेढे वाटत पुण्यात गणेश मंडळांकडून जल्लोष

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


पुणे: कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासने यांच्या मागणीनुसार आज विधानसभेत गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्राचा राज्य महोत्सव म्हणून मान्यता देण्याची आणि १०० कोटी पेक्षा अधिकचा निधी देण्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी तात्काळ निर्णय जाहीर केली, या ऐतिहासिक निर्णयाच्या आनंदोत्सव ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात आरती करुन सर्व गणेश मंडळ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला.


एक गणेश मंडळ कार्यकर्ता विधानसभा सभागृहात गेल्यानंतर काय करू शकतो, हे आज हेमंत रासने यांनी दाखवून दिले. गणेशभक्तांसाठी आणि गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे लाडक्या बाप्पाचा उत्सव आता अधिक भव्य, रंगतदार आणि उत्साहपूर्ण साजरा होणार, अशी भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.



यावेळी सर्वश्री सुनीलभाऊ रासने, सूर्यकांत पाठक,  सुहासजी कुलकर्णी, विकास पवार, महेश सूर्यवंशी, रवींद्र माळवदकर, शिरीष मोहिते, पीयुष शहा, विनायक घाटे, नितीन पंडित, किरण सोनिवाल, कुणाल पवार, राकेश ढाकवे, निरंजन भगत, कमलेश भडसावळे, अनिरुद्ध येवले, सचिन पवार, अमित जाधव, अमर लांडे, विनायक कदम, साई डोंगरे, चकोर सुबंध, प्रतीक इपेते,मंडल अध्यक्ष अमित कंक, छगन बुलाखे, मतदारसंघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र काकडे,  प्रशांत सुर्वे, उमेश चव्हाण, राजू परदेशी, निलेश कदम, प्रणव गांजीवाले, कुणाल गरुड , सनी पवार, किरण जगदाळे, पुष्कर तुळजापूरकर यांच्यासह अनेक गणेश मंडळांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

Post a Comment

0 Comments