मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पर्यटनासाठी नवा प्रवास!
पीएमपीएमएल पर्यटन बससेवा क्र. ८ व ९ चा शुभारंभ
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पर्यावरणपूरक व वातानुकूलित पर्यटन बससेवा उपक्रमाला मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर, क्र. ८ व ९ मार्गांची नव्याने सुरूवात झाली आहे.
दिनांक ८ जून २०२५, सकाळी ९ वा. डेक्कन बसस्थानक येथून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्रीमती दिपा मुधोळ-मुंडे (भा.प्र.से.) यांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ झाला.
या वेळी क्र. ६ साठी एक व क्र. ८ व ९ साठी प्रत्येकी दोन बसेस मार्गस्थ झाल्या.
🚩 १५१ पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
👩🦰 विशेषतः महिला पर्यटकांचा लक्षणीय सहभाग
📆 आता आवश्यक तेवढे बुकिंग झाल्यास आठवड्याचे सातही दिवस सेवा उपलब्ध
✨ बससेवेचे मार्ग:
🔷 क्र. ८: पुणे स्टेशन – स्वारगेट – इस्कॉन मंदिर (रावेत) – मोरया गोसावी मंदिर – प्रतिशिर्डी – देहू – भंडारा डोंगर
🔷 क्र. ९: स्वारगेट – पौड – हाडशी (साईबाबा आश्रम) – कोळवण (चिन्मय विभूती)
🔷 क्र. ६: पुणे स्टेशन – वाघेश्वर मंदिर – वाडेबोल्हाई – छ. संभाजी समाधी – रांजणगाव गणपती
🎟️ सेवा वैशिष्ट्ये:
🔹दर: ₹५००/- प्रति प्रवासी
🔹३३ प्रवाशांचे ग्रुप बुकिंग केल्यास ५ जणांना मोफत तिकीट!
🔹गाईड सेवकाची सुविधा
🔹बुकिंग केंद्रे: डेक्कन, स्वारगेट, पुणे स्टेशन, कात्रज, हडपसर, भोसरी, निगडी, मनपा भवन या पास केंद्रांवरून
🔹बुकिंग व माहिती: श्री. नितीन गुरव – 📱 9850501862
🌿 सुरक्षित, पर्यावरणपूरक व भक्ती-पर्यटनाचा उत्तम पर्याय!




Post a Comment
0 Comments