Type Here to Get Search Results !

आत्मनिर्भर भारतासाठी डिफेन्स टेक्नॉलॉजी महत्वाची डीआरडीओच्या अध्यक्षांचे तांत्रिक सल्लागार मनीष भारद्वाज यांचे विचार एसएसपीयुमध्ये बी.टेक.इन डिफेन्स टेक्नॉलॉजीचा नवा अभ्यासक्रम सुरू



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


पुणे दि.७ जून २०२५:"आत्मनिर्भर भारतासाठी डिफेन्स टेक्नॉलॉजी अत्यंत महत्वाची आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी ज्या पद्धतीने मेक इंन इंडिया महत्वाचे आहे त्याचप्रमाणे सिंदूर घटनेने सैन्य दल आणि तंत्रज्ञानाचे महत्व सर्वांना दाखवून दिले आहे. डीआरडीओने निर्मित केलेले मिसाइल,आकाश, ब्रह्मोस, रडार सिस्टम, ड्रोन हे किती महत्वपूर्ण आहे हे संपूर्ण राष्ट्राने पाहिले. विद्यार्थ्यांनी एक यशस्वी करियर निर्माण करण्यापेक्षा राष्ट्रनिर्मितीत सर्वात मोठा सहभाग घ्यावा. ” असे विचार डीआरडीओच्या अध्यक्षांचे तांत्रिक सल्लागार मनीष भारद्वाज यांनी व्यक्त केले.


सिंबॉयोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या वतिने येत्या शैक्षणिक वर्षापासून नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘बी.टेक इन डिफेन्स टेक्नॉलॉजी’ या अभ्यासक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंबॉयोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार होत्या. तसेच टाटा टेक्नॉलॉजीचे ग्लोबल हेड आणि व्हाइस प्रेसिडेंट सुशील कुमार, गोदरेज एरोस्पेसचे एक्स बिझनेस हेड व व्हाइस प्रेसिडेंट एस.एम. वैद्य, डिमा मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे संचालक शिरीष देशमुख, डिफेन्स कमिटी, एमसीसीआयए, एमडी, एसआरजीएफ वरून खंदारे, डिफेन्स कमिटी एमसीसीआयए हर्ष गुणे हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. 


या प्रसंगी सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र कुलगुरू डॉ. स्वाती मुजुमदार आणि वसुंधरा जीओ टेक्नॉलॉजी अद्वैत कुलकर्णी व डायरेक्टर डीएसए इलेक्ट्रो अँड डिझाइनचे अशोक सुभेदार या दोन कंपन्याबरोबर सामजंस्य करार करण्यात आला.

 


मनीष भारद्वाज म्हणाले," सिंदूर घटनेने डीआरडीओचे महत्व किती आहे हे सर्वांना कळाले. परंतू या क्षेत्रात आणखी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी या क्षेत्रात आणखी संशोधन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या काळानुसार कंपन्या शैक्षणिक संस्था आणि संशोधकांनी एकत्रित देशासाठी मोठा वाटा उचलावा.”


डॉ. स्वाति मुजुमदार म्हणाल्या," आत्मनिर्भर भारत व मेकिंग इंडियाच्या धर्तीवर भारत पुढे जात आहे. देशाच्या सुरक्षितेसाठी ऑपरेशन सिंदूर हे अतिशय महत्वाचे ठरले व डिफेन्स क्षेत्राची गरज लक्षात आली. या शैक्षणिक वर्षात नव्याने सुरू करण्यात आलेला हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा देईल. देशातील ही प्रथम स्किल युनिव्हर्सिटी असून गेल्या ८ वर्षापासून कंपनीच्या आवश्यकतेनुसार येथे विद्यार्थ्यांना कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच आमच्या बरोबर २५० कंपन्यांची भागीदारी आहे.”

" सुरक्षित, मजबूत आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्यासाठी सिम्बायोसिस ने बी.टेक.इन डिफेन्स टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. देशातील काही महत्वपूर्ण कंपन्या लष्करी तंत्रज्ञानात महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. देशातील हजारो युवकांसाठी रोजगार तयार करीत आहेत. एआय, सायबरसुरक्षा, ऑटोनॉमस सिस्टम्स सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या एकात्मिकतेसह हा अभ्यासक्रम मुले आणि मुलींसाठी योग्य आहे. त्यांना भारताच्या भविष्यातील संरक्षण क्षमतांना आकार देण्याची संधी यामुळे मिळेल. संरक्षण तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या उदयोन्मुख क्षेत्रात हा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आहे.”


मेजर जनरल विनय हांडा यांनी अभ्यासक्रमाची व भारतातील सैन्य दलातील चढत्या आलेखा संदर्भात सांगितले की, यात क्षेत्रात खाजगी व सरकारी कंपन्यांचा सहयोग आहे. भविष्यात या क्षेत्राला अत्यंत महत्व प्राप्त होणार आहे. यामध्ये संशोधन, निर्यात क्षेत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता, एरोस्पेस टेक्नॉलॉजीला महत्व येणार आहे. सरळ सरळ देशाच्या सुरक्षतेच्या प्रश्नाशी निगडीत असल्याने या क्षेत्रात २५ टक्के ग्रोथ आहे. ग्लोबल डिफेन्स क्षेत्र हे २.५ ट्रिलियन मधे विखलेले असून यामध्ये १ मिलियन नोकर्‍या उपलब्ध आहेत. डिफेन्स क्षेत्रात ६५ टक्के डिफेन्स एक्प्यूमेंट मॅनिफॅक्चर आहेत. ४३० डिफेन्स कंपन्या आहेत. जवळपास १६ हजार एमएसएमई आहेत. २०२४ ते २५ या वर्षात डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडर टेकिंगमध्ये ४२.८५ टक्के वृध्दि पाहण्यात आली आहे. ” 


यानंतर एस.एम.वैद्य, शिरिष देशमुख, वरून खंदारे, सुशील कुमार, हर्ष गुणे, यांनी आपल्या भाषणात सांगितले की राष्ट्रनिर्मितीसाठी सैन्य दलातील संशोधन, नवे उत्पादन व स्टार्टअप सुरू करण्यासाठी खूप मोठी संधी आहे. असून यात रोजगार ही मोठ्या प्रमाणात आहे. तसेच कोणत्याही विद्यापीठात सिस्टीम इंजिनियरिंग शिकविल्या जात नाही पण सिम्बॉयोसिस स्क्लि युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात सिस्टीम इंजिनियरिंग हा एक नवा अभ्यासक्रम अतिशय उत्तम आहे. क्रिटीकल सिस्टीमसाठी इतर देशांवर अवलंबून न राहता नवीन कल्पनासह आपण स्वतः पुढे येऊन संधी शोधावी.

या प्रसंगी लेफ्टनंट जनरल व्ही.जी. खंदारे व एअर मार्शल भूषण गोखले यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून या क्षेत्रातील भविष्याचे महत्व सांगून शुभेच्छा दिल्यात. 

डॉ.स्मिता शुक्ला यांनी सूत्रसंचालन केले. मेजर जनरल विनय हांडा यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments