मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे दि ८ जुन -
विरोधी पक्षनेते मा राहुलजी गांधी यांनी निवडून आयोगा समोर (सर्व संदर्भा सह) वृत्तपत्रे माध्यमातुन उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर “भाजप’चा कोणताही संविधानीक अधिकार पोहोचत नसतांना”, मुख्यमंत्री फडणवीसां सह भाजप नेते विसंगत राजकीय विधाने व आरोप करण्याची माकडचेष्टा का करताहेत असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी विचारला.
वास्तविक “निवडणूक आयोगाच्या कार्य व कर्तव्यपुर्तीवर” प्रश्न विचारले असतांना, अचानक वावटळ उठल्या प्रमाणेच, ‘निवडणूक आयोगास पाठीशी घालण्याचे, भाजप नेत्यांचे प्रयत्नच मुळात संशयावर शिक्कामोर्तब करणारे’ असुन, भाजप नेत्यांचे हे प्रकार असंविधानीक व निंदनीय प्रयत्न असल्याचे प्रतिपादन काँग्रेस’चे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
आपल्या प्रसिद्धी निवेदनात ते पुढे म्हणाले की,
२०१९ च्या तुलनेत, २०२४ निवडणुकीत, काँग्रेस नेते राहुल गांधींच्या नेतृत्वावर जनतेने १००% शिक्कामोर्तब करून काँग्रेसला ५२ वरून १०२ जागा बहाल केल्या व देशास सक्षम ‘विरोधी पक्ष नेता’ देण्यासाठी जनतेने काँग्रेस’ला अधिक मजबूत केले.
याच जबाबदारीच्या जाणीवेतुन, लोकशाहीच्या जपणुकीसाठी मविआ आघाडीच्या वतीने, विरोधी पक्ष नेते मा राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकी संदर्भात गंभीर मुद्दे सर्व प्रथम संसदेत उपस्थित केले. त्या नंतर मविआ नेत्यांचे सोबत पत्रकार परिषदेत ही ते उपस्थित केले. अ भा काँग्रेस’च्या जेष्ठ नेत्यांनी देखील “केंद्रीय निवडणूक आयोगाकडे” लेखी तक्रारी केल्या, राज्यातील प्रमुख नेते, विरोधी पक्ष नेते, प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री इ नी पत्रकार परीषदेत देखील वेळोवेळी उपस्थित केले. राज्यातील जाहीर नोंदणीकृत मतदार (सज्ञान लोकसंख्या) संख्ये पेक्षा झालेले मतदान जास्त कसे (?) व इतर अनेक गंभीर मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले तसेच अनेक काँग्रेस व मविआ उमेदवारांनी न्यायालयात देखील दाद मागितली आहे.
या सर्व पार्श्व भुमिवर.. कुठेही सत्य व वास्तवतेला दाद दिली जात नाही हे पाहून राहुलजी गांधींनी वृत्त माध्यमातुन हा प्रकार जनतेसमोर आणण्याचा संविधानीक कर्तव्यपुर्तीचा भाग आहे.
मात्र सदर च्या लेखात मा राहुल गांधींनी कुठेही सत्तापक्षाला विचारणा केली नसतांना मात्र विनाकारण निवडणूक आयोगा ऐवजी लक्ष भरकटण्याचे निंदनीय प्रकार भाजप नेते करत असल्याचे काँग्रेस ने म्हटले आहे..!

Post a Comment
0 Comments