अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
पुणे..प्रतिनिधी...
पुणे शहरातील भोसलेनगर येथील आमच्या सोसायटीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेब यांचे नवीन घर झाले आहे. त्याची आज वास्तुशांती होती. यानिमित्त राणे साहेब व परिवाराची पत्नी उषासह भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. नारायण राणे साहेब आणि माझे १९९७ पासून म्हणजे गेल्या २८ वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राणे साहेब म्हणजे रोखठोक व्यक्तिमत्व. महाराष्ट्राच्या राजकारणातील दिलदार नेता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास त्यांना कमी कालावधी मिळाला असला तरी त्यांनी केलेल्या कामांमुळं ते लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत बसले. कोकणावर निस्सिम प्रेम असलेल्या राणे साहेबांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कार्यकर्त्याला बळ दिलं, प्रेम दिलं. त्यामुळं महाराष्ट्रात कुठेही जा… तुम्हाला राणे साहेबांचा चाहता वर्ग भेटेल. आज वास्तुशांतीनिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर साहजिकच त्यांच्याबरोबर राजकीय, सामाजिक व उद्योग विषयांवर बराचवेळ गप्पा झाल्या. राणे साहेबांचं पुण्यात घर झाल्यामुळं ते आता पक्के पुणेकर झालेत. त्यांना उत्तम गृहसौख्य लाभो!
#NarayanRane #BJP #Maharashtra #Pune #Punekar

Post a Comment
0 Comments