Type Here to Get Search Results !

शिक्षण महर्षी एम. डी. शेवाळे साहेब यांचा तृतीय स्मृतिदिन अभिवादन सभेद्वारे साजरा डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे माजी जनरल सेक्रेटरी आणि शिक्षणक्षेत्रात मौल्यवान योगदान देणारे शिक्षण महर्षी एम. डी. शेवाळे साहेब यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम पुणे येथील अहिल्या श्रम, नाना पेठ येथे मोठ्या श्रद्धाभावाने पार पडला.

 


अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे


पुणे.....

शिक्षण महर्षी एम. डी. शेवाळे साहेब यांचा तृतीय स्मृतिदिन अभिवादन सभेद्वारे साजरा

 डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे माजी जनरल सेक्रेटरी आणि शिक्षणक्षेत्रात मौल्यवान योगदान देणारे शिक्षण महर्षी एम. डी. शेवाळे साहेब यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम पुणे येथील अहिल्या श्रम, नाना पेठ येथे मोठ्या श्रद्धाभावाने पार पडला.


या कार्यक्रमाचे आयोजन डीसीएम सोसायटीचे सध्याचे जनरल सेक्रेटरी विशाल भाऊ शेवाळे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डी. टी. रजपूत साहेब होते.


कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार सिद्धार्थ शेवाळे, प्रतिनिधी काजल शेवाळे, मुख्याध्यापिका सौ. शिल्पा भोसले, श्री. उमेश भोसले, मुख्याध्यापिका वर्षा पाटील, प्राचार्य डॉ. विलास कांबळे, उपप्राचार्य डॉ. नरेश पोटे, तसेच मा. महेंद्र कांबळे यांच्यासह डीसीएम संस्थेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या अभिवादन सभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि कार्यकर्ते, तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध चळवळीतील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


सभेमध्ये अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत स्व. एम. डी. शेवाळे साहेबांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा, नेतृत्वगुणांचा व सामाजिक भानाच्या जाणिवेचा गौरव केला. त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत अनेक वक्त्यांनी मांडले.


कार्यक्रमात शेवटी दिवंगत महर्षी एम. डी. शेवाळे यांना सामूहिकरित्या अभिवादन करण्यात आले व त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाची सांगता शिस्तबद्ध आणि सोज्वळ वातावरणात करण्यात आली.

Post a Comment

0 Comments