Type Here to Get Search Results !

सीएं’चंही पाठबळ !

 



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


पुणे.....

समाजाचं आर्थिक स्वास्थ्य सुरळीत ठेवणारा घटक म्हणजे सीए, चार्टर्ड अकाउंटंट! केवळ व्यवसाय नाही, तर विविध घटकांना सामावून घेणारा, विविध उपक्रमांत सातत्याने सहभागी होणारा, समाजाप्रती योगदान देणारा हा घटक संघटित आहे. त्यांच्या पुणे सीए फ्रॅटर्निटीच्या वतीने ‘सीए संवाद : रोड टू विकसित भारत’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. विकसित भारताप्रती असलेल्या सीएंच्या मनातील संकल्पना यावेळी जाणून घेता आल्या.


राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण सीएंनी करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला होता. व्यापाऱ्यांना अतिशय जाचक ठरलेला एलबीटी कर रद्द करून व्यापारी वर्गाला मोठा दिलासा देण्याचा प्रयत्नही भाजपप्रणित सरकारने घेतला होता. त्यामुळे सीएंचा वर्ग भाजपप्रती सकारात्मक दृष्टीने पाहतो आहे. 




यावेळी बोलताना, ‘समाजाच्या तळागाळात काम करताना सीएंना काही अडचणी जाणवल्या, काही प्रश्न निर्माण झाले, तर सर्वतोपरी सहकार्य करू,’ अशी भूमिका मांडली.


माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा विकासाप्रती दृष्टिकोन स्पष्ट आणि स्वच्छ आहे. त्यांना अधिकाधिक पारदर्शक आर्थिक कारभार हवा आहे. या भूमिकेला सर्व सीएंनी अधिक बळ द्यावे, त्यांच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही केले. त्याला सर्वांनीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 


या वेळी सोबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शशिकांत बर्वे, राजेश अग्रवाल, विवेक मठकरी, रेखा धामणकर, शिरीष कुलकर्णी यांच्यासह चार्टर्ड अकाउंटन्सी क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते.


#CASawand #सीए_संवाद

Post a Comment

0 Comments