मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे.......
कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नवनियुक्त पदाधिकारी नियुक्तीपत्रांचे वाटप कोथरुड विधानसभा अध्यक्ष श्री. हर्षवर्धन मानकर यांच्या उपस्थितीत केले.
यावेळी त्यांना विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच या समस्या सोडवण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी कटिबध्द असणार आहेत. तसेच विद्यार्थी अध्यक्ष श्री. शुभम माताळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोथरुड विद्यार्थी अध्यक्ष अनिकेत मोकर आणि कार्याध्यक्ष सागर खिलारे यांनी चांगल्या पद्धतीने विद्यार्थी संघटनात्मक बांधणी केली असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान, या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यार्थी शहर कार्याध्यक्ष श्री. सत्यम पासलकर, श्री. जयजगदिश कोंढाळकर, श्री. विरेंद्र कस्तुरे, श्री. आदित्य घुले, श्री. ध्रुव पाटील यांच्यासह विद्यार्थी संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
#कोथरूड #विधानसभा #नियुक्ती #समारंभ #राष्ट्रवादी #ncp #pune #पुणे
Ajit Pawar
Sunil Tatkare



Post a Comment
0 Comments