Type Here to Get Search Results !

सिओल बन्सिकच्या माध्यमातून पुणेकर खवय्यांसाठी खास कोरियन फूडची पर्वणी*

 



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


पुणे  : शहरात  आजकाल अमेरिकन, युरोपियन पदार्थांची रेलचेल असणारी अनेक हॉटेल्स , कॅफेस आहेत. परंतु मिडल ईस्ट, आशियाई, अशा  नाविन्यपूर्ण संस्कृतीवर आधारित पदार्थांची चोखंदळ चवीच्या पुणेकरांना प्रतीक्षा करावी लागत होती. आता हीच प्रतीक्षा संपली असून खास कोरियन चवीचे अस्सल पदार्थ उत्तम गुणवत्ता व परवडणाऱ्या किमतीत कोरेगाव पार्क येथील सिओल बन्सिकच्या माध्य्मातून पुणेकरांना उपलब्ध होणार आहे.  


सिओल बन्सिकमध्ये कॉफे, व्हेज, नॉन- व्हेज सर्व स्वरूपाचे पदार्थ उपलब्ध होणार असून हे सर्व पदार्थ कोरियन स्टाईल व कोरियन संस्कृतीवर आधारित आहे. अगदी फूड टेस्ट पासून ते फूड सर्विंगपर्यंत सर्व काही पारंपरिक कोरियन स्टाईलप्रमाणे असल्यामुळे आता खव्वयांना थेट कोरियन चव पुण्यात अनुभवयाला मिळणार आहे. सिओल बन्सिकमध्ये कोरियन फूड सह वैविध्यपूर्ण कॉफीचे प्रकार देखील उपलब्ध आहे. माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांच्या हस्ते सिओल बन्सिकचे उद्घाटन करण्यात आले. 


याप्रसंगी सिओल बन्सिकचे मुख्य संचालक व कार्यकारी अधिकारी पीटर जंग, डॉ. राजन संचेती, मौसमी सणस, योगेश पिंगळे, अमित भोसले, बबलू घोलप, डॉ. मुकेश धर्मा, रोहन सोनीस, ओंकार जवाडवर, दिनेश बोरावके, दिनकर चव्हाण, आपका डॉक्टर ब्रैण्ड चे शंकर मांजरे व सियोल बन्सिक फ्रेंचाइजी ओनर ज्योति शंकर मांजरे उपस्थित होते. 


पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात अनेक विदेशी नागरिक राहत असल्यामुळे त्यांना सतत ऑथेंटिक डीशेस आवडतात. याचाच अंदाज घेत शॉप नं ५ वृंदावन, लेन नं ६ कोरेगाव पार्क येथे सिओल बन्सिकची सुरुवात केली आहे. 


सिओल बन्सिकच्या फ्रँचायजीचे संचालक शंकर मांजरे म्हणाले की आंतरराष्ट्रीय स्तरावरील सिओल बन्सिक ह्या फूड चेनची पुण्यात सुरुवात करताना मला अतिशय आनंद होत आहे. अनेकवेळा ग्राहकांना कोरियन फूड म्हटले की ते फक्त नॉन व्हेजच असते अस वाटत परंतु त्याच चवीचे कोरियन टेस्ट व्हेज फूड ग्राहकांपर्यंत पोहचावा हा आमचा प्रयन्त आहे.

Post a Comment

0 Comments