मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे लोकसभा मतदारसंघाचे 'महायुती'चे अधिकृत उमेदवार श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या भव्य विजयासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कटीबद्ध असून त्यांना प्रचंड मताधिक्याने लोकसभेवर पाठवण्याचा निर्धार माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
नुकतीच त्यांना महायुतीकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. या निमित्ताने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माझ्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रसंगी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
देशाला विकासपर्व दाखवणारे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्याचा निर्धार सबंध महायुतीने केला आहे. यासाठी राज्यातून ४५ आणि आपल्या पुणे जिल्ह्यातून चार खासदार मा. मोदीजींच्या पाठीशी खंबीर असतील अशी ग्वाही महायुतीतर्फे देण्यात आली. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#पुणे #लोकसभा #pune #loksabha



Post a Comment
0 Comments