Type Here to Get Search Results !

प्रदेशाध्यक्षांच्या प्रमुख उपस्थितीत शहर कार्यकारिणी आढावा बैठक

 



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली  राज्यात ' चांगल्या वेळे' सह 'अजितपर्वा'ला सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोमाने कार्य करत आहे. आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. सुनीलजी तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजीनगर येथील हॉटेल सेंट्रल पार्क येथे शहरातील सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहराध्यक्ष म्हणून उपस्थित होतो. 




यावेळी प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या कार्याचा आढावा घेत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने काम करणे गरजेचे आहे यांसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. यावेळी सर्व सेल प्रमुख व विधानसभा अध्यक्षांनी आपल्या कार्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांना सुपूर्द केला.  




शहराध्यक्ष म्हणून मी संपूर्ण शहरभर फिरत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका तळागळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम समर्पित भावनेने करत आहे. 



येणाऱ्या काळात शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी मी कार्य करणार आहे. यावेळी बैठकीस सर्व माजी नगरसेवक, कार्यकारिणी सदस्य, विधानसभा, सेल अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 


#राष्ट्रवादी #काँग्रेस #पुणे #शहर #आढावा #बैठक #NCP #Pune 


Ajit Pawar 

Sunil Tatkare

Post a Comment

0 Comments