मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे, दिः १८ ऑक्टोबर: “तत्त्वनिष्ठ पत्रकारिता ही लोकशाही व समाजासाठी सर्वोत्कृष्ठ आहे. आजच्या काळात पीस जर्नालिझम अत्यंत महत्वपूर्ण आहे. समाजात शांती निर्मितीसाठी नव पत्रकारांनी निःपक्षपाती बातम्या दयाव्यात. तसेच, नव्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात करावा.” असे विचार डेली मिलापचे वरिष्ठ संपादक ऋषी सुरी यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन, पुणेतर्फे पाचव्या राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषद, कोथरुड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे आयोजित करण्यात आली. याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
पुणे युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट, मुंबई प्रेस क्लब, आर. के.लक्ष्मण संग्रहालय आणि नवी दिल्ली फॉरेन करस्पॉन्डंटस क्लब ऑफ साउथ एशिया यांच्या सहयोगाने ही परिषद होत आहे.
यावेळी टाईम्स नाऊचे संपादक निकुंज गर्ग, पुढारी न्यूज टीव्हीचे राष्ट्रीय संपादक प्रसन्न जोशी आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, स्कूल ऑफ मिडिया कम्युनिकेशनचे सहयोगी अधिष्ठाता धिरज सिंग, एसओजीचे संचालक डॉ. पाबीशेट्टी व डॉ. अंजली साने उपस्थित होत्या
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनात व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली ही परिषद होत आहे.
ही परिषद प्रसारमाध्यमांच्या विकसित होणार्या लॅडस्केप, पत्रकारितेवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव आणि पत्रकार सामाजिक मतभेद कसे दूर करू शकतात आणि एकता वृध्दिंगत होऊ शकते का? या विषयावर आयोजित करण्यात आली आहे.
ऋषी सुरी म्हणाले,“समाजात शांती स्थापनेसाठी सोशल मिडियाच्या माध्यमातून कॅम्पेन गरजेचे आहे. तसेच, उत्तम समाज निर्मितीसाठी शांतीपूर्ण पत्रकारितेला प्राथमिकता दयावी. आजच्या काळात ह्यमून स्टोरीला प्राधान्य देऊन शांती विषयाला अनुसरून ही परिषद अत्यंत महत्वाची आहे.”
निकुंज गर्ग म्हणाले,“आव्हानांचा सामना आणि प्रेशर शिवाय पत्रकारिता होऊच शकत नाही. ज्यावेळेस आपल्यावर अधिक प्रेशर येईल त्यावेळेस असे समजावे की आपण उत्तम प्रकारे काम करीत आहोत. विश्वास आणि प्रगती या दोन गोष्टींवर आपला फोकस ठेऊन प्रामाणिकपणे पत्रकारिता करावी.”
प्रसन्न जोशी म्हणाले, “आजची पत्रकारिता विषय अनुषंगाने नसून त्याला स्टाईल ऑफ जर्नालिझम असे संबोधले जाते. पक्षपाती आणि निःपक्षपाती पद्धतीवर सुरू असलेल्या पत्रकारितेमुळे भारतीय लोकशाही कुठे चालली हा प्रश्न उभा राहतो. मिडियाच्या माध्यमातून जनतेला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करावा.त्यासाठी उघड्या डोळ्यांनी पहा, सर्वांचे ऐका आणि मगच आपले रोख ठोक विचार मांडावे.”
पांडुरंग सांडभोर म्हणाले,“पत्रकारितेत मोठे बदल होतांना या क्षेत्रात काय आव्हाने आहेत हे तपासणे गरजेचे आहे. अशा आव्हानांचा सामना करून पुणे श्रमिक पत्रकार संघ वेळोवेळी त्यानुसार कार्यक्रमांचे आयोजन करतात. ”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,“महाभारतातील संजय हा सृष्टीवरील प्रथम पत्रकार असून त्यानंतर नारद मुनी हे दुसरे पत्रकार आहेत. पण नारदमुनी यांनी कळ लावायचे काम अधिक केले. त्यामुळे नव पत्रकारांनी कोणत्या पक्षात पत्रकारिता करावी याची निवड करावी. तसेच पूर्वग्रहदुषित पत्रकारिता व एकाच बाजूची बातमी दाखवू नये. तसेच, पत्रकारितेचे धडे देणार्यांनी निस्पृह असावे.”
डॉ. धिरज सिंग यांनी माध्यमांसमोर येणार्या आव्हानांवर चर्चा केली.” डॉ.आर.एम.चिटणीस यांनी स्वागत पर भाषण केले.
डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अंजली साने यांनी आभार मानले.
जनसंपर्क विभाग,
एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे
बॉक्स
तोरा अग्रवाल व सोनल पटेरिया यांना ‘जर्नलिझम फॉर पीस’ पुरस्कार
पत्रकारितेतील संवाद, सर्वसमावेशकता आणि शांतता संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एमआयटी डब्ल्यूपीयूद्वारे या वर्षी मुक्त पत्रकार तोरा अग्रवाल आणि लल्लनटॉपच्या पत्रकार सोनल पटेरिया यांना जर्नलिझम फॉर पीस पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आहे.
पुरस्काराला उत्तर देतांना तोरा अग्रवाल म्हणाल्या, “६ महिन्यांपासून मणिपूर येथील विषय हाताळतांना अनेक कटू अनुभव आले. मुक्त पत्रकारिता करीत असल्याने संपूर्ण नॉर्थ इस्टचे दरवाजे माझ्यासाठी खूलेे आहेत.”
सोनल पटेरिया म्हणाल्या, “कोटा येथील मुलांची आत्महत्या हा विषय हाताळतांना अनेक अडचणी आल्या. यावेळी आम्ही सायकॉलॉजीस्टचा साक्षात्कार घेतल्यानंतर येथील सत्य वास्तव्य समोर आले. आज त्याच विषयाच्या अनुषंगाने पुरस्कार मिळतांना आनंद होत आहे.”




Post a Comment
0 Comments