Type Here to Get Search Results !

महर्षी’ पुरस्कार यंदा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व ज्येष्ठ साहित्यिक मा.ज्ञानेश्वर मुळे यांना जाहीर

 मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


२९ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी दिला जाणारा मानाचा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य व ज्येष्ठ साहित्यिक मा.ज्ञानेश्वर मुळे यांना महाराष्ट्र इंडस्ट्री विकास असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष व एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे अध्यक्ष मा. चंद्रकांत साळुंखे  यांच्या हस्ते गुरुवार  दि. १९ ऑक्टोबर २०२३ रोजी सायं. ५. ०० वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येईल.


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, आ. संजय जगताप आणि ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.



आबा बागुल

आयोजक अध्यक्ष

पुणे नवरात्रौ महोत्सव

Post a Comment

0 Comments